हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव व हिमायातनगर नगरपरिषदेला वैशिष्ट्यपूर्ण या योजने अतर्गत हदगाव नगरपरिषदेला 0.८५ कोटी.व हिमायनगर नगरपंचायतला 0.९५ कोटी रुपये मंजुर करण्यात आले होते. परंतु लोकसभेची निवडणूक संपताच ती रक्कम हिगोली नगरपरिषदेला आचानक पणे नगरविकास मंञालयाने वर्ग केल्याचे पञ हदगाव व हिमायनगर परिषदेला दिले. शासनाच्या या निर्णायमुळे नागरिकात आश्चर्य व्यक्त होत असुन, या बाबतीत सदर निधी कुणाच्या दबावखाली हिगोली नगरपरिषदेला वर्ग करण्यात आला. या बाबतीत हदगाव विधानसभाक्षेञाचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी पुढील आठवड्यात होणा-या पावसाळी अधिवेशनात प्रश्न माडावा अशी इथल्या जनतेची अपेक्षा आहे.
या बाबतीत मिळालेली माहीती अशी की, लोकसभाची निवडणूक होताच राज्याचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी नागरी विकास विभाग द्वरे दि.११जुन २०२४ रोजी जारी केलेल्या पञकात म्हटले आहे की, वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष आनुदान द्वरे हदगाव हिमायनगर व जिल्ह्यातील इतर तालुक्याला कामा करिता दिलेला निधीच्या संदर्भात या कामास कार्यारंभ दिला नसल्याने सदर कामे रद्द करुन सदर कामाचा निधी हिगोली नगरपरिषदेला कामा करिता मंजुर करण्यास सदर शासनाच शुध्दीपञकान्वे मान्यता देण्यात येत असल्याच स्पष्ट आदेश राज्याचे उपसचिव यांनी हदगाव नगरपरिषद व हिमायनगर नगरपचायतला दिलेलं आहे.
अचारसंहीता मुळे वर्कआर्डर काढता आली नाही/मुख्यधिकारी नितीन लुंगे
हदगाव नगरपरिषदेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअतर्गत निधी उपलब्ध झालेला होता. परंतु या काळात लोकसभा निवडणूकीची अचारसहीता मुळे कार्यारंभ आदेश काढता आले नाही. अस हदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नितिन लुगे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सागितले .
पावसाळी आधिवेशनात हा प्रश्न मांडा/ त्रस्त नागरिक …
हदगाव व हिमायनगर नगरपालिकेच विकास निधी काही तरी तांत्रिक कारणे दाखवुन राज्याचे उपसचिव यांनी हा निर्णय कुणाच्या राजकीय दबावखाली घेतला काय यांची माहीती जनतेला होण्यासाठी हदगाव विधानसभा क्षेञाचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उचलुन धरावा. जेणे करुन या बाबतीत जनतेला नेमके कारण काय आहे कळेल. कारण हिगोली लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांचा परभाव होताच काही आठवड्यातच मंजुर झालेल निधी हिगोली नगरपरिषदेला वळविण्यात आलेल आहे. ह्याला कुठं तरी राजकीय दबावाच वास येत आहे.
कारण जे कारण राज्याचे उपसचिव यांनी निधीच कार्यारंभ न केल्या मुळे निधी हिगोली जिल्हाला वर्ग करण्यात येत आहे अस नमुद करण्यात आले. परंतु लोकसभेची अचारसंहीता आसल्या मुळे वर्कआर्डरकाढता आली नाही. अस नपा. प्रशासनाचे म्हणने आहे आसाच प्रकार किनवट नपा. माहुर नगरपचायतीच पण आहे. नेमके काय प्रकार आहे जो पर्यत विधानसभाच्या पटलावर येणार नाही तोपर्यंत सत्य काय आहे समजु शकणार नाही. या करिता एकच पर्याय आहे विद्यमान हदगाव व किनवटच्या आमदारानी राजकीय परिस्थिती न पाहता पावसाळी आधिवेशनात हा प्रश्न मांडावा अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.