नांदेड। येथील पालीनगर येथील संबोधी बुद्ध विहार समितीच्या वतीने आणि भन्ते विनय बोधी प्रिय यांच्या मार्गदर्शनात दिनांक 28 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळ नागपूर द्वारा प्रस्तुत दोन अंकी मराठी नाटक बाबा का जागले ? बाबा का रडले? या दोन अंकी नाटकाचा 217 वा प्रयोग पाली नगर येथे भिम अनुयायान हा अनुभवता आला .
भन्ते विनय बोधी प्रिय गेल्या वर्षभरापासून संबोधी बुद्ध विहार पाली नगर नांदेड येथे वास्तव्यास आहेत. विविध उपक्रमातून ते बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज उभे करण्याचा प्रयत्न करत असतात. बुद्ध धम्माची शिकवण देण्याचे काम ते पौर्णिमा नगर, पाली नगर, तथागत नगर, इथं अहोरात्र करतात त्याच अनुषंगाने बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 133 व्या जयंतीनिमित्त पाली नगर ,तथागत नगर आणि परिसरातील बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी बाबासाहेबांचे समाजासाठीचे योगदान ,तळमळ आणि समाज जागृतीचे कार्य बाबासाहेबानी अहोरात्र जागून दिन दलितांना आपले हक्क मिळवून दिले.
हे नाटक बाबा का जागले ? बाबा का रडले? या नाटकातून कलाकारांच्या जिवंत अभिनयाने अनुभवता आले.नाटक पाहताना प्रत्यक्षात डॉ बाबासाहेब आपल्या समोर आहेत एवढा जिवंत अनुभव प्रेक्षकांना आला.डॉक्टर बाबासाहेब यांच्या भूमिकेत आश्विन नाईक यांनी अक्षरशः प्रेक्षकांना खिळवून घेऊन ठेवले त्यांच्या संवादातून प्रेक्षाकांच्या अंगावर शहारे उभे राहत होते.ऍड. एडवोकेट विद्या खोब्रागडे यांनी माता रमाईची भूमिका साकारताना प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळले, शितल बोडके यांनी नाटकाचे दिग्दर्शन सांभाळत रिपोर्टरची भूमिका साकारली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संबोधी बुद्ध विहार महिला मंडळ,पाली नगर येथील सामाजिक कार्यकर्ते राजू दूधमल ,मधुकर हनुमंते , संजय खंदारे, ज्ञानोबा दुधमल ,दशरथ गायकवाड,कुलदीप ढोले,प्रभाकर बुक्तरे,आणि पाली नगर येथील उपासकांनी परिश्रम केले.