
हदगाव, शेख चांदपाशा। हदगाव विधानसभा क्षेञांत तप्त उन्हात जीवाची लाहीलाही होत असतांना ही 66% मतदान झाल्याची माहीती आहे. निवडणूक विभागाकडुन पुरेशी व्यवस्था नसतांना ही मतदारांनी स्वयस्फुर्तीने निवडणूक विभागाच्या असुविधेची कोणती ही तक्रारी न करता शुक्रवारी मतदान केले. इतर तालुक्याच्या दृष्टीने हदगाव विधानसभाक्षेत्रांत मतदानाच्या टक्के वारीत वाढ झाली. आता कुणाला जास्त मतदान झाले आणि कोणाला लीड भेटणार याबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत.
आजी माजी आमदार राज्याचे आजी माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीयमंत्री यांनी हदगाव विधान सभाक्षेञांत आपआपल्या उमेदवाराच्या प्राचार दरम्यान हजेरी लावल्यामुळे हिगोली लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. काही राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्याच्या समर्थकाकडुन तर चक्क आमच्या नेत्यांन दिलेल शब्द पाळला म्हणून आता पासुनच उदो-उदो करण्यास सुरुवात केली. असे असले तरी या लोकसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हदगाव विधानसभा क्षेत्रांच्या निवडणूक पुर्वतयारी म्हणून स्थानिक नेत्याकडुन प्रचार करण्यात आल्याच स्पष्ट जाणवत होते.
विशेष म्हणजे लोकसभेतील मतधिक्यातून येणाऱ्या काळातील विधानसभेच ट्रेड असल्याचे हे निश्चित होणार असले तरी हदगाव विधानसभा क्षेञातील आजी माजी आमदार खासदार व माजी केद्रियमंञी असलेल्या स्थानिकांनी माञ उमेदवारांच्या प्रचाराच्यावेळी शेतक-याचे प्रश्न, शेतमजुर, रोजमजुरीच्या व सुशीक्षित बेकार युवकांच्या प्रश्न, मजुरांच स्थालतर याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे जाणवल. एव्हढेच नाही तर हदगाव विधानसभा क्षेत्रातील मुलभूत विषय बाजुला टाकण्यात आले. आणखी विशेष म्हणजे महाविकास आघाडी कडुन हदगाव विधानसभाक्षेञाचे विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी विधानसभा क्षेञात आपल्या कार्नर बैठकीद्वरे मतदारांना महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांना मतदान करा असा प्रचार केला. आणि ‘ मी काँग्रेस मध्येच राहणार ‘अस वारंवार कॉर्नर बैठकी सागतांना दिसुन आले. माञ ते काँग्रेस मध्येच राहणार या विषयी माञ थेट स्थानिक पत्रकारांना सागत नसले तरी त्यांची स्थानिक माध्यम विषयी एक प्रकारची नाराजी तर नव्हे ना. अशी चर्चा पण पञकारात ऐकवायास मिळत आहे.
विशेष म्हणजे त्याचे पुर्वीचे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री व सध्याचे भाजपा चे नेते आशोक चव्हाण यांच्या विरोधात त्यानी अध्याप काही बोलले नाहीत हे आवर्जून उल्लेख करावा लागेल. ही लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर व महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर व वंचित बहुजन आघाडीचे डाँ बी.डी. चव्हाण याच्यातच खरी लढत होणार असल्याचे दिसुन येते. लोकसभा पेक्षा विधानसभा महत्त्वाची आहे अस विविध स्थानिक राजकीय नेत्याच्या प्रचारामुळे दिसुन आल. विशेष म्हणजे महायुतीचा प्रचार यंञणा प्रथम सर्वसोयीयुक्त होती परंतु ऐनवेळी नियोजनाच अभाव दिसुन आला. महाविकास आघाडीने आधी पासुनच प्रचाराला सुरुवात केली होती. वंचित बहुजन आघाडी कडे ऐन निवडणूकीच्या काळात त्यांच्याकडे साधनांची कमतरता जाणवली असली तरी काही एकनिष्ठ कार्यकर्ते माञ जोमाने ग्रामीण भागात प्रचार करतांना दिसुन आले. माञ हदगाव निवडणूक विभागाकडुन माञ लोकसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माञ स्थानिक माध्यमाना माञ योग्य ते सहकार्य मिळालेल नाही. जर प्रसार माध्यमांना पाचारण करून जनजागृती केली असती तर अणखीन ही मतदाराचा टक्का वाढला असता केवळ व्हाट्सअप द्वारे प्रशासकीय बैठकीच्या बातम्या देण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात त्या बैठकीत पत्रकारांना बोलण्यात येत नव्हते.
पण निवडणूक विभागाच्या त्या नऊ अँपची माध्यमाद्वरे जनजागृती होणे अवश्यक होती. पण निवडणूक विभागाला ह्या अँप विषयी वारंवार विचारणा केल्यावर ही मिडीया सेटर प्रमुखांनी ने माहीती दिली नाही. काही अँप तर असे होते की उमेदवाराने आपला अर्ज दाखल केल्या पासुन ते मतमोजणी पर्यंतचा प्रवास मतदार यांना आपल्या हातातील मोबाईल द्वरे जाणुन घेता आले असते. अश्या एक नव्हे अनेक सोयी निवडणूक विभागाने पारदर्शकता यावी म्हणून मतदारांना उपलब्ध करुन दिलेल्या होत्या मात्र त्याची माहिती दिली गेली नसल्याने मतदार राजा शासनाच्या निवडणूक व8 भागाच्या महितीपासून दूर झाले होते हे विशेष.
