नवीन नांदेड| नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश ठाकूर, तर ऊपाघ्यक्षपदी शाम जाधव, कार्याध्यक्ष म्हणुन तिरूपती पाटील घोगरे यांच्यी हडको येथील दतकृपा मंगल कार्यालय येथे १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक १२ फेब्रुवारी रोजी माजी अध्यक्ष किरण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी त्यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष पदासाठी रमेश ठाकूर यांच्यी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली, या वेळी नव्याने पत्रकार संघात तिघांच्या समावेश करण्यात आला. कार्यकारिणी मध्ये ऊपाघ्यक्षपदी शाम जाधव, तर कार्यघ्क्षपदी तिरूपती पाटील घोगरे, सचिव निळकंठ वरळे,तर कोषाध्यक्ष अनिल धमणे,तर सल्लागार म्हणून तुकाराम सावंत, किरण देशमुख, सदस्य म्हणून सुर्यकांत यनावार, सुनिल कुलकर्णी, सारंग नेरलकर यांच्यी निवड करण्यात आली.
पदाधिकारी निवड झाल्यानंतर हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पदाधिकारी यांनी अभिवादन केले. निवडीबद्दल नवीन नांदेड पदाधिकारी यांनी अभिनंदन केले तर माजी नगरसेवक राजेंद्र कुलथे, ब्रिज लाल ऊगवे, वृक्षमित्र मोहनराव पाटील घोगरे यांनी अभिनंदन करून स्वागत केले.