![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2024/02/IMG_20240205_202606.jpg)
नांदेड। महापालिकेच्या व तहसीलच्या वसिलेबाज अधिकाऱ्यांनी सीटू आणि जमसंच्या आंदोलनास हलक्यात घेतल्याने दि.५ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता शकडो कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणा देत मनपा आणि तहसील प्रशासनाचा धिक्कार करीत जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने केली. निर्लजम् सदा सुखी, मनपा व तहसील प्रशासन मुर्दाबाद, मनपा मधील विविध घोट्याळ्याची सीआयडी आणि विभागीय चौकशी झालीच पाहिजे! दोषींवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे! अशा गगनभेदी घोषणा देऊन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर सीटू आणि जमसं च्या कार्यकर्त्यांनी दनानून सोडला होता.
२७ जुलै च्या अतिवृष्टीचे अनुदान चार महिने होऊनही मिळाले नाही.व बोगस पूरग्रस्त दाखवून करोडो रुपयांचा अपहार केला.ही बाब कुठल्याच अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधीना गंभीर वाटत नाही. सीटू कामगार संघटनेने तहसील कार्यालय नांदेड, नांवाशमनपा मुख्य कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालया समोर ३ ऑगस्ट पासून २० वेगवेगळी आंदोलने करून शासनाचे आणि स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधून नांदेड शहरातील पूरग्रस्तांच्या कुटुंब प्रमुखास दहा हजार रुपये मंजूर करून घेतले आहेत.
दि.१६ फेब्रुवारी पासून बेमुदत साखळी अमरण उपोषण सुरु आहे.
आज पर्यंत केलेल्या आंदोलनास ५ फेब्रुवारी रोजी १०० दिवस पूर्ण झाले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा घोटाळा, दिवाबत्ती घोटाळा, गुंठेवारी आणि बांधकाम घोटाळा, ड्रेनेज लाईन घोटाळ्यासह इतरही घोटाळे झाले आहेत. त्या सर्व घोटाळ्याची सीआयडी आणि विभागीय आयुक्त कार्यालया मार्फत वभागीय चौकशी करून दोषीविरोधात सेवेतून कायम बडतर्फीची कारवाई करावी. तसेच अपहार झालेली रक्कम वसुल करावी ह्या मागण्यासह इतरही मागण्या करण्यात आल्या असून जिल्हाधिकारी कार्यालया समोरील बेमुद्दत साखळी अमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. शंभर दिवस होऊनही मागण्या संदर्भात ठोस निर्णय होत नसल्याने निर्लजम् सदासूखी मनपा आणि तहसील प्रशासन मुर्दाबाद च्या गगनभेदी घोषणा देऊन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दनानून सोडला.
या वेळी सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी उपस्थित आंदोलकांना संबोधित केले असून ते म्हणाले की, नांदेड मनपा मध्ये राजतोसपने करोडो रुपयांचे घोटाळे सुरु आहेत. आणि ते घोटाळे उघडकीस आणल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. कारण गुंठेवारीच्या प्रकरणात प्रकरण त्रुटीत आणले जाते आणि नंतर आर्थिक व्यवहार करून गुंठेवारी आणि बांधकाम परवाना दिला जातो. त्रुटीतील सर्व प्रस्तावाची पाहणी केल्यास मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे उघड होणार असून ते आम्ही सर्व शोधणार आहोत.
तसेच सीसीटीव्ही कॅमेरे शहरात कुठे कुठे लावले आणि आता काय परिस्थिती आहे व त्यासाठी किती पैसे खर्च केलेत ही सर्व माहिती काढणे सुरु असून अजून शंभर दिवस लागले तरी हरकत नाही, परंतु यांना धडा शिकविल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असे स्पष्ट केले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष्याच्या पॉलिट ब्युरो सदस्या कॉ. वृंदा करात आणि कॉ. डॉ.अशोक ढवळे हे दोन पॉलिट ब्युरो नांदेड येथे २२ फेब्रुवारी रोजी येत असून त्यांना निवेदन देऊन केंद्रात मागणी करणार आहोत. असे देखील संघटनेचे म्हणणे आहे. या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ.उज्वला पडलवार, कॉ.करवंदा गायकवाड कॉ.लता गायकवाड, कॉ.पंढरी बरुडे, कॉ. श्याम सरोदे,कॉ.त्रेवेणीताई बहादुरे, कॉ.कांताबाई तारू, कॉ.मारोती केंद्रे आदींनी केले.
![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2023/11/Hardweyar-Nagu.jpg)