उस्माननगर। नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या करण्यात आल्या ,असल्यामुळे उस्माननगर येथील पोलीस ठाण्यात उत्कृष्टपणे कामगिरी करणारे कर्तव्यदक्ष( सिंघम )पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांची विमानतळ नांदेड येथे बदली झाल्यामुळे त्यांच्या निरोप तर नव्याने लिंबगाव येथून उस्माननगर पो.स्टे. ला रूजू झालेले बि.जी.पवार यांच्या स्वागतासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.कर्तव्यदक्ष अधिकारी सपोनि शिवप्रकाश मुळे यांना निरोप देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सपोनि श्री.पवार हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून स.पो. उपनिरीक्षक गाडेकर , सपोउपनि केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उस्माननगर येथील पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सिंघम सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी आपल्या कार्यकाळात ६२ गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तन,मन होऊन सेवा केली. कोरोणाच्या काळात मुळेनी रस्त्यावर उतरून नागरिकांना शांतता व सलोखा राखण्यासाठी उपयुक्त पावले उचलून लोकांना कोरोनाची भिती दूर केली. गोरगरिबांना बाहेर फिरू नका अशी विनंती करत.गरजू लोकांना किटचे वाटप केले. सपोनि मुळे यांनी पोलिस स्टेशनला आलेल्या नागरिकांना व फिर्यादीना समजदारीने सांगून समस्यांचे निवारण करण्यात अग्रेसर होते. तंटे गावातच मिटवून दोन्ही पार्ट्यांना शांतता राखण्यासाठी सांगून कायदा हातात घेऊ नये असे आवाहन करीत होते.
आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सपोनि यांच्या बदल्या करण्यात आल्या.त्यामध्ये उस्माननगर येथील कर्तव्यदक्ष ( सिंघम) सपोनि शिवप्रकाश मुळे यांची विमानतळ नांदेड येथे बदली झाल्याने निरोप समारंभ तरव नव्याने लिंबगाव येथून आलेले सपोनि पवार यांच्या स्वागत समारंभ सोहळ्यासाठी उस्माननगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांची उपस्थिती होती.
यावेळी शिराढोण ,गोळेगाव ,वाका , तेलंगवाडी ,बारूळ , जोमेगाव ,उमरा ,सावळेश्वर ,मंगलसांगवी , नंदनवन , आलेगाव ,या सह परिसरातील नागरिक उपस्थित होते. श्री. मुळे यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ,हार पेढा भरवून जड अंतःकरणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला.यावेळी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम वारकड गुरूजी, देवराव पांडागळे ,सुरेश मामा बास्टे, बालाजी घोरबांड , आमिनशहा फकीर , अशोक काळम ,राहुल सोनसळे मुख्याध्यापक, दत्ता पाटील घोरबांड , सुर्यकांत माली पाटील, देविदास डांगे ,लक्ष्मण कांबळे, शिवकांत डांगे ,शुभम डांगे , यांच्या सह अनेक गावांतील पोलिस पाटील, सरपंच , सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गाडेकर (सपोउपनि) यांनी केले.