लोहा। लोहा शहरात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने लेझीम ढोल ताशांचा गजर ,करत शोभायात्रा शहरातून काढण्यात आली.
जिजामाता ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अंतर्गत शिवछत्रपती विद्यालयात १२ रोजी सकाळी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर , संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार, उपाध्यक्ष केशवराव मुकदम यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन क व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर शहराच्या मुख्य रस्त्याने भव्य शोभा यात्रा निघाली .राष्ट्रमाता जिजाऊ.. जय शिवराय..या घोषणांनी शहर दुमदुमले.
जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार ,यांच्या मार्गदर्शनाखाली कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या पुढाकाराने शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सावित्री ते जिजाऊ महोत्सव साजरा करण्यात येतो प्रसिद्ध व्याख्याते बालाजी गवाले यांचे व्याख्यान झाले.
यंदा आठवे वर्ष आहे .जिजाऊ जयंती निमित्ताने पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर , संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ चव्हाण,शफी नाले, अप्पाराव पवार,जमादार जामकर, मुख्याध्यापक दामोधर वडजे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच जी पवार, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सुलतान शेख, यासह शहरातील मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन झाल्या नंतर तैलचित्रास भव्य शोभायात्रा शहराच्या मुख्य रस्त्याने निघाली. आकर्षक संगीतमय लेझीम, जिजाऊंच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यानी, याचा शोभायात्रेत समावेश होता.शहरातील सामाजिक ,राजकीय तसेच विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिजाऊंच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले .मिरवणुकीत जागोजागी संगीतमय लेझीम क्रीडा शिक्षक दिलीप काहलेकर यांनी आजारी असतानाही अतिशय सुंदरतेने विध्यार्थीनी शिकविले व ते विद्यार्थ्यांनी सादर करत शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.मिरवणुकीत धावते संचलन रमेश पिठ्ठलवाड यांनी केले मुख्याध्यापक दामोधर वडजे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच जी पवार , सर्व शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.