नांदेड। नांदेड जिल्हा हत्तीरोग दूरीकरणसाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम नांदेड जिल्ह्य़ातील दहा तालुक्यात दि.१० फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने आज दि.१२ फेब्रुवारी रोजी लातूर हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक डॉ संजय ढगे यांनी जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे पूर्व तयारी बाबत बैठक घेऊन एमडीए मोहीम नांदेड जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करुन सूचना दिल्या पाहणी केली तसेच राष्ट्रीय किटक जन्य रोग नियंत्रण कार्यक्रम चा आढावा घेतला व त्यांच्या कार्यालयातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी लक्ष्मीकांत सोनवणे, किटक समाहारक अखिल कुलकर्णी हे सोबत होते.
यावेळी डॉ आकाश देशमुख जिल्हा हिवताप अधिकारी नांदेड, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मोहन पेंढारे, सचिन दळवी, गणेश सातपुते, गंगाधर गन्लेवार, सुभाष चव्हाण, आरोग्य सहाय्यक माधव कोल्हे, सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार, जिल्हा हिवताप कार्यालय व हत्तीरोग नियंत्रण पथक कार्यालय नांदेड येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.