ज्ञानेश्वरी हि कलयुगातील वाघीण आहे; तीच दूध पचवायला शिका – ज्ञानेश्वरी प्रवक्ते अर्जुन महाराज खाडे

हिमायतनगर, अनिल मादसवार| ग्रामीण भागातील युवा पिढी व्यसनाधीन होत असल्याने माणुस रसातळाला जातो आहे. या पासून होणारी हानी टाळण्यासाठी युवकांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे, आणि वडीलधाऱ्या मंडळींचा मान सन्मान करत त्यांचा आदेश शिरसंधान मानत जीवनाची दिशा निवडली पाहिजे. ज्ञानेश्वरीने रेड्याला देव बनविला…. यासाठी सर्वानी ज्ञानेश्वरी ग्रंथाच अवश्य पठण केलं पाहिजे ज्ञानेश्वरी हि कलयुगातील वाघीण आहे. तीच दूध पचवायला शिका असा संदेश ज्ञानेश्वरी माऊली ग्रंथाचे प्रवक्ते ह.भ.प. श्री अर्जुन महाराज खाडे आळंदीकर यांनी युवा पिढीला दिला.
ते नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाळकेवाडी येथे दि २२ -२३ फेब्रुवारी दरम्यान श्री गुरू समर्थ रामबापू मेटकर महाराज संस्थान मंदिर कलशारोहण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने आयोजित समारोपिय कीर्तन सोहळ्यात उपस्थित भाविक भक्तांना प्रबोधन करतांना बोलत होते. किर्तनातून प्रबोधन करताना ते पुढे म्हणाले की, शेतात पेरलं जाणार एक बी योग्य वेळेवर पेरलं तर त्या कणिसाला हजारो बिया येतात. भगवंताने मनुष्याला शंभर वर्ष आयुष्य दिल त्यात एक गुण तुम्हाला दिलेले आहेत. आणि भगवंतांकडे सहा गुण आहेत यश.. श्री.. औदार्य, ज्ञान… वैराग्य… ऐश्वर्य… आहेत. यापैकी एक गुण तो प्रत्येक जाती धर्मातील लोकांना अंशात्मक देत असतो. तुम्ही जर तेच गुण हृदयाला बाळगला आणी प्रयत्नवादी बनला तर तो देव होतो देव… ज्ञानेश्वरीने रेड्याला देव बनविला…. मग तुमच्यातील तो गुण कळला पाहिजे… त्या गुणांचा त्याने जर विस्टा केला तर तोच सद्गुण त्याला देव बनवितो… आणि तुम्हाला त्याची किंमत नाही कळली तर तोच गुण तुमच्या जीवनाच मात्र करतो..
उदाहरण द्यायचं झाला तर वादच झाड आहे.. त्या वडाचं बी खसखसी एवढं असते… त्याचा एवढा मोठा वटवृक्ष होतो कि त्याचा विस्तार होऊन त्याच साल, बूड, फांद्या, डहाळ्या, पान, फळ.. त्याची अशी पेकिंग असते. याचा असाच विस्तार होत नाही त्या बीजाला जमिनीमध्ये गाडावे लागत… ते केवळ जमिनीत उगवत कोरड्या फुपाट्यात नाही आणि ओल्या चिखलातही उगवत नाही. तुमचं अंतःकरण, हृदय म्हणजे जमीन आहे… तुमचं जीवन म्हणजे बीज आहे…. तुम्हाला पेरणारे श्रीगुरु आहेत. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वरी माउली सांगतात हे विश्वाची माझे घर आहे… असं समजून माणसांना आपलं जीवन चालती बोलती ज्ञानेश्वरी सारखा बनवायला हवं असा उपदेश ज्ञानेश्वरी माऊली ग्रंथाचे प्रवक्ते ह.भ.प. श्री अर्जुन महाराज खाडे आळंदीकर यांनी दिला.
पुढे प्रबोधन करताना ते म्हणाले कि, काहीजण रात्ररात्र नुसत्या मोबाईलवर बावळट सारखं बारा एक वाजेपर्यंत गुरफळून रहातात आणि सकाळी अकरा वाजता उठून रात्री लय अभ्यास केलाय असे सांगत उठतात… याचे परिणाम एक दिवस नक्कीच भोगावे लागतात. त्यामुळे युवा पिढीने केवळ मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा भविष्याचा विचार करून आपल्यातील गुणांचा विस्तार करण्यासाठी जीवनाचे रूपांतर बीजामध्ये करून त्याचा वटवृक्ष केल्यास जिवण सुंदर बनते. जो व्यक्ती आपल्या आई-वडिलांची सेवा करेल त्यांचा मान सन्मान होतो. त्यासाठी आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहिल्यास कुटुंबातील सर्व जण सुखी आणि समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही असा कानमंत्र हि त्यांनी दिला. या किर्तनसेवेत ह.भ.प. सौ. गीताताई महाराज खाडे (भांगे), ह.भ.प. श्री मुगुट महाराज धायगुडे, सह तबलावादक सचिन बोपिलवार, शिवप्रसाद डोरले यांच्यासह येथील भजनी मंडळांनी त्यांना साथ दिली. यावेळी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, पुसद येथून आलेले वारकरी मंडळीसह परिसरातील भाविक भक्त व दुधड वाळकेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
