
हंडरगुळी/उदगीर/लातूर,विठ्ठल पाटील| उदगीर तालुक्यातील हंडरगुळी हे राज्यमार्गा लगत वसलेले मोठे गाव असुन येथील गुरांचा बाजार देशात सुप्रसिद्ध आहे. जनतेच्या रक्षणासाठी व गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्साठी येथे खुप वर्षा पासुन पोलिस चौकी आहे. आणि ही चौकी आज जिथे आहे. तिथे “वेअर हाऊस” { गोडाऊन } आहे… की काय? असा प्रश्न नवागतांना पडायचा.
तसेच आपल्या समस्या घेऊन आत येणारी जनता एखाद्या कोंडवाड्यात आलो की काय…?असे पुटपुटायचे. पण उदगीर शहरात “दबंगगिरी” / नौकरी केलेले व महिण्यापुर्वी हंडरगुळी येथे नौकरी- वर “मेन ईनचार्ज” म्हणुन “जाॅईन” झालेले पोहेकाॅ.संजय दळवे-पाटील यांनी हंडरगुळीच्या चौकीचे आतुन रुपडेच पालटले असुन,एखाद्या ViP अधिका-याच्या कार्यालयासारखे या चौकीत कलर करुन नवीन रुम्स व अधिकारी यांचेसाठी स्पेशल आफीस बनवले आहे. यामुळे येथे तक्रार वा समस्या घेऊन येणा-या अभ्यागतांना आत “एन्ट्री” करताच “फ्रेश” वाटते आहे.
तसेच नवा गडी, नवे राज, नुतन दबंग जमादार संजय दळवे यांनी चढवला पोलीस चौकीला नवीन जमान्या सारखा नवा साज…. अशी चर्चा हाळीसह परिसरात सुरु आहे.. तसेच वरिष्ठांचे “फर्मान” येण्यापुर्वीच अवैध धंदेवाल्यांची धरपकड करताना व गुन्हेगारांना “सुंदरी”चा “प्रसाद” देत असताना बघुन तत्कालीन i.p.s. पोलीसाधिकारी श्री.निकेतन कदम यांच्या “धडाकेबाज” “सिंघम” कार्याची आठवण अनेकांना येते आहे. तसेच पोलीस चौकीत नको नको ते धंदे करणारे “मुखडे” दिसत व बसत नाहीत. म्हणुन नुतन सपोनी. भिमराव गायकवाड व पोहेकाॅ.संजय दळवे पाटील यांच्या “दे-दणादण” कार्याचे सामान्य हाळी हंडरगुळीकरातुन कौतूक होत आहे.
अपघातास कारण ठरतील असे व वाहतुकीस अडथळा करणारे गाडे व अतिक्रमणधारक यांचेवर कारवाही करणे गरजेचे बनले आहे. हाळी व हंडरगुळी ही दोन गावे राज्य मार्गालगत असुन उदगीर नंतर सबंध तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळे व या भागातील 50/60 गावचे लोकं दैनंदीन व्यवहारासाठी येथेच ये-जा करतात. यामुळे मार्केट व राज्यमार्गावर पदचारी व वाहनांची सदा गर्दी असते.माञ बसस्थानक ते ऊदगीर रोड लगत सा.बां.विभागाने बांधलेल्या नालीवर व पुढे कुणाचाही हक्क नसताना अनेकांनी “बापाची प्राॅपर्टी” असल्यासारखे अतिक्रमण केले आहेत. यांच्यामुळे व रोडटच थांबलेली वेडीवाकडी बाईक्स व हातगाडे यांचे- मुळेच मागे झाला तसा जिवघेणा अपघात होऊ शकतो.म्हणुन याकडे लक्ष घालुन कर्तव्यदक्ष व जनहितदक्ष सपोनी.भिमराव गायकवाड,जमादार संजय दळवे-पाटील यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.व ते लक्ष देतील.अशी चर्चा हाळीहंडरगुळीत ऐकू येत आहे.
