७ जानेवारी रोजी ‘सावित्री – रमाई’ महोत्सवाचे नांदेडात आयोजन
नांदेड| येथील बुद्धीष्ट रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने माता रमाई यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीच्या औचित्याने शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात ७ जानेवारी २०२४ रोजी ‘सावित्री-रमाई’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सावित्रीमाई यांच्या क्रांतीकार्याला आणि रमाईच्या असिम त्यागाला अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात आंबेडकरवादी विचारवंत सुषमा अंधारे आणि आंतरराष्ट्रीय किर्तीच्या गायिका कविता राम यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती निमंत्रक तथा नगरसेवक महेंद्र पिंपळे, स्वागताध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, संयोजक प्रविणकुमार कुपटीकर यांनी दिली. यावेळी संयोजन समितीच्या अध्यक्षा अंजली मुन्नेश्वर, कार्याध्यक्ष सत्यपाल सावंत, सहकार्याध्यक्ष अजय एडके, सचिव विजय सोंडारे, फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कोंडदेव हाटकर यांची उपस्थिती होती.
नवीन वर्षातील पहिल्या आठवड्यात ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वा. पासून सुरू होणाऱ्या सावित्री रमाई महोत्सवात उद्घाटन, व्याख्यान, पुरस्कार वितरण, स्मरणिका प्रकाशन, कविसंमेलन, आंबेडकरी संगीत संध्या आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आंबेडकरी विचारवंत तथा प्रख्यात व्याख्यात्या सुषमा अंधारे आणि आंतरराष्ट्रीय किर्तीच्या गायिका कविता राम यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन संयोजन समितीचे उपाध्यक्ष राज गोडबोले, कोषाध्यक्ष जी. पी. मिसाळे, डॉ. रामचंद्र वनंजे, प्रभू ढवळे, लक्ष्मीकांत हटकर, डॉ. किशन गायकवाड, संध्या जांभळे, रमेश कसबे, संजय जाधव, आर. पी. कोकलेगावकर, अर्चना गवारे, शोभा कोकरे, सुमेधा हटकर, नागोराव डोंगरे, अनुरत्न वाघमारे, पांडुरंग कोकुलवार, मारोती कदम, शंकर गच्चे, कैलास धुतराज, रणजित गोणारकर, चंद्रकांत कदम, प्रशांत गवळे, प्रकाश ढवळे नागलगांवकर आदींनी केले आहे.