धर्म-अध्यात्मनांदेड

श्री गुरुदेव दत्त जयंती निमित्ताने आयोजित गुरुचरित्र पारायण सोहळा समाप्ती सोमवारी होणार

हिमायतनगर| श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजित गुरुचरित्र पारायणाची सांगता शनिवार दि.२५ डिसेंबर रोजी होणार असून, आरतीनंतर प्रसाद वाटप होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीपासून श्री गुरु देव दत्त जयंती निमित्ताने श्री गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. गुरुचरित्र महोत्सवाची समाप्ती मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी १४ शके १९४५ रोज सोमरारी २५ डिसेंबर रोजी होणार आहे. दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसाद वाटप केलं जाणार आहे.

यावेळी सर्व दत्तभक्त भाविकांनी शहरातील बजरंग चौक भागात असलेल्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिराजवळील वाळके गुरु यांच्या निवास्थानी उपस्थित होऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गजानन गुरु किशनराव वाळके यांनी केलं आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!