वर्धा -नांदेड नवीन रेल्वे प्रकल्पाकरिता विद्यमान आमदार व खासदार सभागृहात प्रश्न माडतील काय …?
हदगाव, शेख चादपाशा| हदगाव शहराच्या व तालुक्याच्या विकासाच्या मराठवाडा विदर्भाच्या दळणवळण दृष्टीने अत्यंत महत्त्वपुर्ण असणा-या वर्धा यवतमाळ नादेड हा नवीन रेल्वे मार्ग गेल्या १५वर्षापासुन कासवगतीने सुरु आहे यामुळे हदगाव विधानसभा क्षेञाचे आ. माधवराव पाटील जवळगावकर व हिगोली लोकसभाचे खा हेमत पाटील यांनी सभागृहात हा प्रश्न विशेष मागणी द्वरे प्रश्न मांडावा अशी मागणी हदगाव तालुक्यातील जनतेची आहे.
या बाबत माहीती अशी की, या वर्धा यवतमाळ नादेड रेल्वेमार्गाचे उद्घाटन तात्कालिन रेल्वेमंञी लालुप्रसाद यादव यांनी २००८ च्या दरम्यान भूमिपुजंन करण्यात आले होते. या मध्ये ४०% राज्य शासन ६०%वाटा केद्रशासनाच होता विदर्भात माञ या रेल्वे प्रकल्पला तेथील आमदार खासदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने गती आलेली आहे. माञ या बाबतीत माञ मराठवाड्याच्या आमदार खासदार यांनी किती प्रयत्न केले याची माहीती उपलब्ध होत नसली तरी हा रेल्वे मार्ग पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर असल्याची माहीती मिळाली. पण हदगाव तालुक्यात या प्रकल्पाचे काम केव्हा सुरु होणार..? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
वर्धा यवतमाळ -नादेड काही ठिकाणी भूसंपादन पूर्ण तर काही ठिकाणी अंतिम टप्यात आहे. हा नवीन रेल्वे प्रकल्प २८४ किलोमिटर हे अंतर रेल्वेने कमी वेळात कमी खर्चासह सोयीचे ठरणार आहे. विशेष म्हणजे या रेल्वे प्रकल्पाचे प्रथम टप्यातील वर्धा ते कंळब ४० कि.मी. आणि कंळब ते यवतमाळ ३८ किमीचे काम ९०%टक्के पुर्ण झाल्याची माहीती आहे. पण हदगाव तालुक्यात माञ जमीन अधिग्रहण करुन ही कामाला अध्याप सुरुवात झालेली नाही हे आवर्जून उल्लेख करावा लागेल. या रेल्वे लाईनवर १५ मोठे ब्रीज २९ बोगदे आहेत.
रेल्वेमंञी मराठवाड्याचे असुन ही …
नादेड हिगोली जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून हा रेल्वे प्रकल्प फार महत्त्वाचा असुन, या बाबतीत या विधानसभा लोकसाभाच्या आमदार खासदारांनी विशेष प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे रेल्वेमंञी आपल्या मराठवाड्यातील असुनही आपले लोकप्रतिनिधी त्यांचा उपयोग घेत नाहीत. ही दुर्दैवाची बाब आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. या नवीन रेल्वे प्रकल्पाचे काम वर्धा- देवली-कंळब- तळेगाव -यवतमाळ- लसिना-तपोना-दारव्हा- अंतरगाव- हर्सुल-दिग्रस- बेलगव्हाण-पुसद-हर्शी-शिलोना-पळसी-उमरखेड -हदगाव – बामणी-अर्धापुर -दाभड-नादेड हे रेल्वे स्टेशन राहणार असल्याची माहीती आहे.