धर्म-अध्यात्मनांदेड
विष्णुपुरी येथे हभप सौ. वैशाली पाटील नरसीकर यांच्या मधुर वाणीतून रामकथेला प्रारंभ
नवीन नांदेड| संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त रामकथा अखंड हरिनाम सप्ताह ४ ते १० डिसेंबर दरम्यान ह.भ.प.सौ. वैशाली पाटील नरसीकर यांच्या समधुर आवाजातुन दुपारी २ ते ५ या वेळेत मुख्य हनुमान मंदिर खालची गल्ली विष्णुपुरी ता. जि. नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.
रामकथा प्रारंभ ४ डिसेंबर पासून सुरूवात झाली असून हभप सौ. वैशालीताई पाटील नरसीकर यांच्या समधुर वाणीतून आयोजित केली असून तबला वादक प्रमोद धनगरे,सिंथ वादक दिपक हानवते,गायक माऊली वसेकर,रमेश मगर हे साथ संगत देणार आहेत. या रामकथा सोहळ्याला जास्तीत जास्त भाविक भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन नांदेड दक्षिण आमदार मोहनराव हंबर्डे व ग्रामपंचायत विष्णुपुरी संरपच प्रतिनिधी विलास ऊर्फ राजु हंबर्डे व माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव हंबर्डे यांनी केले आहे.