नांदेड/किनवट| ठोस आणि सबळ पुरावे सादर करा नाहीं तर चौकशी बंद करू असे नेहमीचं म्हणणाऱ्या उप वनसंरक्षक यांना ठोस आणि सबळ पुरावे सादर केलेले असतांनाही चौकशी टाळली जाते म्हणजे या अवैध वृक्ष तोडीस त्यांचे खुले पाठबळ तर नाहीं ना अशी शंका स्पष्ट दिसतं आहे. किनवट आणि बोधडी मधील राखीव जंगलात सागवान झाडांची होणारी अवैध वृक्ष तोड थांबवण्यासाठी आणि वृक्ष तोडीस सहकार्य करणारे अधिकारी यांचा वर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनात विधानभवन परिसरात आमरण उपोषण आणि मुख्यमंत्री यांचे दालनात आत्मदहन आंदोलनाचा इशारा लेखी निवेदन द्वारे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांनी मा.मुख्यमंत्री साहेब यांचे कार्यालयास ई मैल द्वारे पाठवला आहे.
मराठवाड्यातील एकमेव जंगल असलेल्या किनवट तालुक्याला मौल्यवान आणि टिकावू अश्या सागवान लाकडाच्या जंगलाने व्यापलेले आहे.एकीकडे शासन 2 कोटी,33 कोटी,50 कोटी वृक्ष लागवड अश्या विविध प्रकारच्या योजना आखून झाडे लागवड करताना दिसत आहे.तर दुसरीकडे ज्यांचावर येथील पूर्णत वाढ झालेल्या राखीव जंगलाच्या रक्षणाची जबाबदारी दिलेली आहे अश्या वन विभागातील कर्मचाऱ्यांत राखीव जंगल नष्ट कसे होईल हे बघण्यात चढाओढ लागलेली दिसतं आहे.
किनवट आणि बोधडी या दोन्ही वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय अंतर्गत असलेल्या राखीव जंगलातील अवैध वृक्षतोडीचे प्रकरण ठोस आणि सबळ पुराव्यासह मा.अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक साहेब,(संरक्षण) महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांनी सादर केले होते.ज्याला चौकशी कामी मा.मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद यांचे कडे तर त्यांनी ते उप वनसंरक्षक नांदेड येथील मा.वाबळे साहेबांकडे वर्ग करण्यात आलेले होते.ते त्यांनी सहायक वनसंरक्षक नांदेड यांचे कडे चौकशी कामी दिले होते.अशी ही टोलवाटोलवी होत आहे परंतु ठोस आणि सबळ अशी कोणतीही कार्यवाही अवैध वृक्ष तोड थांबवण्यासाठी होताना दिसत नाही आहे. चौकशी साठी ठोस आणि सबळ पुरावे सादर करा नाहीतर चौकशी बंद करू असे पत्रव्यवहार करत चौकशीसाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेलेले आजपर्यंत घडलेले आहे.
चौकशी अधिकारी यांना ठोस आणि सबळ पुरावे सादर केलेले असतानांही चौकशी साठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत अवैध वृक्ष तोडीस एकप्रकारे पाठबळ देणाऱ्या सुस्त चौकशी अधिकारी यांचा मार्फत चौकशी केली जाईल असे दूर दूर पर्यंत दिसतं नसल्याने सदरील प्रकरणी चौकशी मा. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक साहेब (संरक्षण) नागपूर यांचे मार्गदर्शन खाली नागपूर येथील विभागीय वन अधिकाऱ्यानं कडून करत दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करत राखीव जंगलाचे रक्षण करावे अन्यथा नाईलाजाने लोकशाही मार्गाने दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी पासून मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय समक्ष विधानभवन परिसर (संविधान चौक)नागपूर येथे आमरण उपोषण सुरू करण्याचे निवेदन पर्यावरणवादी कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांनी दिलेले आहे.
सदरील प्रकरणी ठोस आणि सबळ पुरावे सादर केलेले असतानांही चोकशी साठी दिरंगाई होत असल्याने प्रशांत वाठोरे यांनी प्रत्यक्ष उप वनसंरक्षक केशव वाबळे साहेबांकडे चौकशी सुरू करण्याची मागणी केली असता त्यांनी मी चौकशी अधिकाऱ्याला बोलतो असे सांगत चौकशीला बगल देत एकप्रकारे अवैध वृक्ष तोडीस खुले समर्थनच दिलेले दिसतं आहे.