बिलोली/नांदेड। येथील पत्रकार, शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने गेल्या अकरा वर्षा पासूनची परंपरा कायम राखत बिलोली शहरातील झोपडपट्टी व विजयनगर येथील वंचित व उपेक्षितांना मिठाई,खाऊ व अंधा-या घरात दिवे लाऊन दिपावली हा साजरा करण्यात आला. उपेक्षितांच्या घरात ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ पुढाकार घेणार असल्याचेही यावेळी संस्थेचे अध्यक्ष यांनी जाहीर केले.
दिवळी हा सन म्हणजे प्रकाशाचा उत्सव असतो. बिलोली शहरातही दिवाळी हा सन मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. मात्र शहरात एकीकडे लख्ख प्रकाश अन् फटाक्यांची आतिषबाजी तर दुसरीकडे काळोख अन् अंधार असा दुजाभाव पहावयास मिळायचा. एकाच शहरातील हा दुजाभाव पाहून बिलोली येथील जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव मुंडकर यांच्या संकल्पनेतून गत अकरा वर्षापुर्वी शहरातील गोर गरिबांची वस्ती असलेल्या झोपडपट्टी, नविन बसस्थानक परिसर व दगडापुर परिसरातील अधा-या घरात प्रकाश करून वंचितांच्या सोबत दिपावली हा सन साजरा करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला.
या उपक्रमात शिक्षक सेनेचे अध्यक्ष बालाजी गेंदेवाड, राजाराम कसलोड,सय्यद रियाझ आदींनी सक्रीय सहभाग घेतला. स्वताच्या परिवारासोबत तर सगळेच दिवाळी साजरी करतात पण वंचितांच्या अंधा-या घरात प्रकाश करून त्या सोबत दिवाळी साजरी करण्याच्या उपक्रमात कालांतराने अनेकांनी सहभाग घेतला. यंदाच्या वर्षीही दि. १२ नोव्हेंबर रोजी सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख व जेष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील झोपडपट्टी व दगडापुर येथील वितांसोबत दिवाळी चा सन साजरा करून आजही शिक्षणापासून वंचित असलेल्या पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी लहान मुलांच्या पालकांशी चर्चा करण्यात आली. गडद अंधाऱ्या असलेल्या घरात दिवा लाऊन दीपावली साजरी करण्यात आली.
यावेळी बालाजीराव गेंदेवाड यांच्या विशेष परिश्रमाने स्वतः बनवलेले खाद्य पदार्थ वितरित करण्यात आले. यावेळी आडत व्यापारी अनुदत्त रायकंठवार, तळणीचे मुख्याध्यापक बालाजी डाके. राजाराम कसलोड, बसवंत मुंडकर शिवराज गागिलगे,सय्यद रियाझ, अमोल गेंदेवाड, चंद्रकांत कुडकेकर, साईनाथ केशोड आदी उपस्थित होते. उपेक्षितांच्या घरातील माध्यमिक शिक्षणासाठी उपेक्षितांच्या घरातील मुलांना दत्तक घेतले जाईल. असे संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी यावेळी जाहीरपणे अज्ञानाचा अंधार ज्ञानाच्या दिव्याने दूर करण्याचा संकल्प केले.