नायगाव, रामप्रसाद चन्नावार। तिरंगा दुर्गा महोत्सव येथे प्रतिवर्षी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत गोवळकर गुरुजी रक्तपेढी नांदेडच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा दुर्गा महोत्सव च्या वतीने राजुरा मारुती मंदिर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात शहरातील 51 रक्तदात्यांनी स्वयउस्फुर्तपणे रक्तदान केले.
तिरंगा दुर्गा महोत्सव चे अध्यक्ष माधव शंकरराव पा. कल्याण यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे दरवर्षी आयोजन करण्यात येते या रक्तदान शिबिरात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता पा. सावरखेडकर विधानसभा प्रमुख विठ्ठल पा.चोळाखेकर, मा. नगरसेवक देविदास पा.बोमनाळे, विनोद सावकार गंजेवार, बाबासाहेब हंबर्डे, पञकार गजानन चौधरी ,प्रभाकर लकपत्रेवार ,गंगाधर पाटील कल्याण, माधव पा. चव्हाण , साहेबराव पा. कल्याण, साईनाथ सांगवीकर, संजय पा. कल्याण ,अवकाश पा.धुपेकर , राजेश पा.कल्याण,राजु आप्पा बेळगे,पंडित पा.कल्याण,शेषराव देगावे,माधव आनेराये,दत्ता यसके, शिवराज नागठाणे,दत्ता पा.नारे,देविदास पांचाळ,सुरज कदम,साईनाथ नरवाडे, गिरी कल्याण,शुभम नरवाडे, सोमनाथ महाराज,गोपाळ आवळे, प्रथम सालेगाये, ओमकार पांचाळ,उपस्थित होते.