नांदेड। चेत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात नवमी या दिवशी श्रीराम लल्लाचा जन्म झाला होता, म्हणून त्या दिवशी श्रीराम नवमी उत्सव साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर पतंजली योग परिवार नांदेड तर्फे बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी चंदिराम अँड सन्स, रजिस्ट्री ऑफिस शेजारी, स्टेडियम रोड, नांदेड या ठिकाणी श्रीराम नवमी साजरी करण्यात आली.

सकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान योगवर्ग घेण्यात आला, त्यानंतर वैदिक यज्ञ करण्यात आले. आदरणीय श्री नारायणराव कुलकर्णी तसेच श्री यादव भांगे व श्रीमती गंगुबाई मारंपल्ले यांनी यज्ञासाठी मार्गदर्शन केले, नंतर श्रीरामजींच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. नारायणराव कुलकर्णी, यादव भांजे, गोवर्धन अग्रवाल यांनी श्रीराम नवमी निमित्त उपस्थित नागरिकांना संबोधन केले.

याप्रसंगी सर्वश्री गोवर्धन अग्रवाल, शिवाजीराव शिंदे हळदेकर, नारायणराव कुलकर्णी, यादव भांगे, गंगुबाई मारंपल्ले, यशोदाबाई शिंदे, दिगंबर पाटील, श्रीराम मोरे, उद्धव चाबरकर, श्रीरंग मोरे, गोपाळ कासट, अनिल कामीनवार, माधव देवडे, रंजीत हटकर, सुभाष जाधव, मारुती कदम आदी मान्यवर उपस्थित होते असे अनिल अमृतवार यांनी सांगितले.

