नांदेड। स्व. बंसीलालजी काबरा आयकर विक्रीकर व्याख्यानमाला सर्वघटकांसाठी उपयोगी असून विशेषतः गेली 26 वर्षें या द्वारे शैक्षणिक आणि वाणिज्य क्षेत्राला लाभ मिळत आहे. वर्तमान परिस्थितीत व्यापारी वर्ग, करदाता टैक्सेशन अभ्यासक्रमातिल विद्यार्थ्यांसाठी सुसंस्कार घडावी अशी ही व्याख्यानमाला आहे. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक आणि गंगापुर येथे आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ जगदीश कदम यांनी केले.
व्याख्यानमालेचे 26 वें पुष्प गूंफतांना सीए असित शहा मुंबई यांनी जीएसटी विषयावर सखोल मार्गदर्शन केले. एडवोकेट शुभम राठी छ. संभाजीनगर यांनी आयकर विषयावर मार्गदर्शन केले. सीए पवन मुंदडा नांदेड यांनी बँक ऋण प्रणाली विषयाचे मार्गदर्शन आपल्या व्याख्यानाच्या माध्यमेतुन केले.
व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात व्याख्यानमाला आयोजनाचे कौतुक केले. ते म्हणाले, नांदेड शहरात व्याख्यानमालेने एक परंपरा सुरु केली आहे ज्याची तुलना महाराष्ट्रातील इतर कोणत्याही विषयावरील व्याख्यानमाला कार्यक्रमाशी होऊ शकत नाही. ही परंपरा भविष्यात पिढ्यान पिढ्या सुरु राहावी ही सदिच्छा.
कार्यक्रमात सीए क्षेत्रातील प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व हर्षदभाई शहा यांचे सहपत्नी आणि परभणी येथील कर सल्लागार जगदीश मुंदडा यांचे सहपत्नी सत्कार करण्यात आले. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत डीटीएल विषयात गुणवंत ठरलेले विद्यार्थी प्रथम सुजाता गवळी नांदेड , द्वितीय राधेश्याम येमुल नांदेड आणि तृतीय अपूर्वा पिंपळनेरकर लातूर यांचा सह कुटुंब सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे प्रस्ताविक सीए प्रतीक काबरा यांनी केले. तर सूत्रसंचालन सीए नीलम भट्टड आणि सीए सोनल सारडा यांनी केले. आयोजन समिति च्या सर्व सदस्यांनी व्याख्यानमालेच्या सफलतेसाठी प्रयत्न केले कार्यक्रमात मोठ्या संख्येत डीटीएलचे विद्यार्थी आणि व्यापारी कर सल्लागार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.