नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील तुप्पा या गावातून १४ वर्षीय मुलागा घराच्या बाहेर गेला असतांना त्यास अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणासाठी पळवून नेले असुन या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ आक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता सिद्धांत भिमराव सोनवने वय 14 वर्ष रा. तुप्पा ता जि नांदेड हा घराच्या बाहेर गेला असता त्यास कोणीतरी अज्ञात व्यंकतीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे.
असल्याचे भिमराव सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हा तपास पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऊपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड हे करीत आहे. सदरील मुलाचे वर्णन ऊची चार फुट दोन ईच, रंग सावळा, पोशाख पांढरा रंग, निळा रंग जिन्स पॅन्ट, भाषा मराठी शिक्षण दहावी असून सदरील मुलगा कोणास सापडल्यास किंवा माहिती कळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामीण पोलीस स्टेशन चे ऊपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड यांनी केले आहे.