रातोळी येथे श्री रोकडेश्वर महाराज यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी

नायगाव, रामप्रसाद चन्नावार। येथून जवळच असलेल्या रातोळी तालुका नायगाव परीसराचे श्री रोकडेश्वर महाराज देवस्थानची यात्रा दरवर्षी भरत असून यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे .
यात्रेनिमित्त दिनांक २४ फेब्रुवारी रोजी श्री रोकडेश्वराला अभिषेक पुजन , कृषि प्रदर्शन तसेच रात्री १० वाजता पालखी मिरवणूक , १२ वाजता नयनरम्य आतिषबाजी तसेच गणगवळण भारुडांचा कार्यक्रम होईल .दिनांक २५ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद व दुपारी दोन वाजता जंगी कुस्त्यांचा फड भरणार असून शेवटची मानाची कुस्ती ११०००/- होईल .
दिनांक २६ फेब्रुवारी रोजी माळेगाव यात्रेच्या धरतीवर लोककला व लावणी कलामहोत्सवाचे आयोजन केले असून हा कार्यक्रम सकाळी १० ते सायंकळी ६ पर्यंत सुरु राहणार आहे यामध्ये शालेय स्पर्धा इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत महाविद्यालयीन पदवी लोककला महोत्सव विशेष लावणी स्पर्धा सकाळी दहा ते दोन पर्यंत लोककला महोत्सव आणि दुपारी दोन ते सहा पर्यंत विशेष लावणी महोत्सव सादर होईल .
यामध्ये विजेत्यास प्रथम , द्वितीय तर लावणी स्पर्धेसाठी विशेष बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिले आहे . तसेच तीनही दिवस के .गणेश कुमार पुसद प्रस्तुत नटसम्राट आर्केस्ट्रा व लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा कार्यक्रम सुरू राहणार आहे . तरी या श्री रोकडेश्वर यात्रा महोत्सवाचा लाभ नायगाव तालुका तसेच जिल्हा परिसरातील जनतेने घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने केले आहे .
