नांदेड,अनिल मादसवार| जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता पोलीस अधिक्षक नांदेड यांनी, अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांनी स्था. गु.शा. चे एक पथक व सायबर पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेणेची मोहीम राबविण्यात आली होती.

नांदेड जिल्हयातील स्थागुशाच्या पथकाने जिल्हयातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळया ठिकाणी जावून एकूण 102 मोबाईल किंमत 13,54,900/- रूपयाचे हस्तगत केले आहेत. त्यापैकी आज एकत्रितरीत्या मा. पोलीस अधिक्षक साहेब यांच्या हस्ते 56 मोबाईलचे वाटप करण्यात आले आहेत. उर्वरीत मोबाईलचे IMEI क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाचे Facebook Page व Twitter वर आहेत. आले आहे. त्यापैकी नागरीकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक ओळखुन सायबर पो.स्टे. नांदेड येथून मोबाईल घेवून जाण्याचे आवाहन सायबर पो.स्टे. यांनी केले आहे.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार, नांदेड डॉ. श्री खंडेराय धरणे, भोकर, पो. नि. श्री उदय खंडेराय स्थागुशा, पो.नि ओमकांत चिंचोलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शाचे सपोनि / रवि वाहुळे, पोउपनि / दशरथ आढे, सायबर पो.स्टेचे पोउपनि जी. बी. दळवी पो.स्टे सायबर पोलीस अमंलदार सुरेश वाघमारे, राजेन्द्र सिटीकर, दिपक ओढणे, रेषमा पठाण, दाविद पिडगे, मोहन स्वामी, काशिनाथ कारखेडे, मोहमद आसिफ, विलास कदम, राजीव बोधगिरे, व्यंकटेश सांगळे यांनी पार पाडली. सदर कामगीरी बाबत पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version