नांदेड। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल हे 4 मार्च रोजी नांदेड दौऱ्यावर आले होते. शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालय येथे मराठा संवाद बैठक सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आली होता.
सोलापुर येथील दौरा आटोपून ते नांदेड साठी रवाना झाले परंतू त्यांची तब्बेत अतिशय नाजूक असल्या कारणाने ते थोडं निवांत व रस्त्याने सत्कार घेत घेत नांदेड येथील बैठकीला हजर झाले.पण थोडा उशीर झाला,जवळ पास 4 तास समाज जरांगे पाटिल यांची वाट पाहत होता, सभाग्रह भर गच्च भरले होते एखाद्या नेत्याच्या सभेलाही एवढी गर्दी झाली नसेल तेवढी गर्दी ही सर्व सामान्य कुटुंबातील संघर्ष योध्याच्या बैठकीला झाली होती हे पाहून सरकार हादरले बैठक अशी झाली तर येणाऱ्या काळात सभा कशी होईल याची धास्ती घेत नियमांवर बोट ठेऊन पोलिसांच्या माध्यमातून भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल व त्यांचे सहकारी सभेचे आयोजक श्याम पाटिल वडजे यांच्या वर गुन्हा नोंदवला गेला होता.
सदरील गुन्हा मागे नाही घेतला तरी चालेल आयोजका कडून नियमांच उल्लंघन झालंच असेल तर बैठकीचे आयोजन करणाऱ्या समाज बांधवावर गुन्हा दाखल केला तरी हरकत नाही पण त्यात मार्गदर्शक म्हणुन लाभलेल्या मराठा समाजाची अस्मिता असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने न करता सदरील गुन्ह्यातून जरांगे पाटील यांचे नाव काढण्यात यावे अशा अशायाचं निवेदन आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना सकल मराठा समाजाकडून देण्यात आलं.
नांदेड जिल्हा हा चळवळीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नांदेड मध्ये अनेक मातब्बर राजकारणी असताना सुद्धा नांदेडच्या गरजवंत मराठ्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. आरक्षणाच्या लढ्यात नांदेड जिल्हा स्वयंस्फूर्तीने जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला होता व कायम राहील यात शंकाच नाही परंतु संविधानिक व शांततेचे आंदोलन आज पर्यंत जरांगे पाटील करत आले आहेत. मेळाव्यातही त्यांनी शांततेचे आवाहन केले कुठलेही प्रक्षोभक विधान त्यांनी केलेलं नसतानाही जाणीवपूर्वक हे सरकार पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने मराठ्यांच्या संघर्ष योद्धा व सहकाऱ्यांना जाणीवपूर्वक गोवण्याचे कटकारस्थान केल्या जात आहे परंतु गरजवंत मराठा हा डाव मोडून काढेल यात शंकाच नाही.
नांदेडचा गरजवंत मराठा कालही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत होता आणि भविष्यातही राहील.
सभा घेतली म्हणून जर आमच्या प्रेरणास्थान असलेल्या जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा नोंदवल्या जात असेल तर सभेत उपस्थित असलेल्या प्रत्येकावर गुन्हा दाखल करून दाखवा असा प्रश्न गरजवंत मराठा आज पोलीस प्रशासनास करत आहे. सदरील गुन्ह्यातून जरांगे पाटील यांचे नाव वगळण्यात नाही आले तर येणाऱ्या काळात सकल मराठा समाजाच्या रोषाला सरकार आणि प्रशासन या दोघांनाही जावे लागेल.असा जळजळीत ईशारा सुद्धा सकल मराठा समजाकडून देण्यात आला.