
हिमायतनगर। हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय येथे प्राणीशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.उज्ज्वला सदावर्ते होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.श्याम इंगळे यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या आयोजक डॉ.सविता बोंढारे, प्राणीशास्त्र विभागप्रमुख व डॉ. डी. सी.देशमुख होते.
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते डॉ.सी.व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिवस का साजरा करतो? याचे उद्देश व महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या नंतर कु.जानवी चव्हाण, कु. पूजा शेलगावकर, कु. उर्मिला पांनपटकर, कु.प्रियंका बोधनकर, कु.अदिबा खानम या विद्यार्थिनींनी त्यांचा आदर्श असणाऱ्या शास्त्रज्ञांबदल माहिती व त्यांनी लावलेला शोध वर्णन केला. अध्यक्षीय समारोपात डॉ.उज्ज्वला सदावर्ते यांनी आपल्या आजूबाजूला असलेल्या विज्ञानाचे निरीक्षण करा त्यातून नवनवीन गोष्टी शिका असे सांगितले.

२८ फेब्रुवारी रोजी डॉ. सी .व्ही रामण यांनी रामण इफेक्टचा शोध लावल्यामुळे त्यांना सन 1930 रोजी नोबेल पारितोषिक दिलं गेलं त्यामुळे 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो त्यांचाच आदर्श तुम्ही सायन्सच्या विद्यार्थ्यानी ठेऊन भविष्यात कधीही हार न मानता प्रगती करा अश्या त्या म्हणाल्या. त्यांनी जिज्ञासुवृत्तीच्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन प्रेरित केले. दैनंदिन जीवनातील ज्ञान प्रयोगाच्या रूपाने घेऊन वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवा असे सांगितले. या कार्यक्रमासाठी डॉ. के.बी.पाटील, डॉ.महेश वाखरडकर (रसायनशास्त्र प्रमुख), डॉ.सय्यद जलील (गणित विभाग प्रमुख), श्री. राजीव डोंगरगावकर, श्री. बालाजी चांदापुरे, श्री. सचिन कदम व सर्व विज्ञान विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचलन व आभार कु.दिपाली शिंदे हीने व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
