मानाठा/हदगाव। दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दि.01-10-23 ते 07-10-23 मध्ये वनविभागाकडुन वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर मनाठा येथे दि.05-10-23 गुरुवार रोजी जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा मनाठा येथे वन्यजीव सप्ताह निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय मनाठा, संयुक्त वन व्यवस्थापन समीती मनाठा , वनपरिक्षेत्र कार्यालय हदगाव यांचे वतीने वन्यजीव सप्ताह कार्यक्रमाचे साजरा करण्यात आला, यावेळी शाळा परिसरात वृक्ष लागवड करून संगोपनासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी विशाल शिंदे तर कार्यक्रमाचे उद्घाटक संजय पाटील सुर्यवंशी पत्रकार तथा (अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समीती मनाठा) होते. यावेळी प्रमुख पाहुणे शामराव पाटील सुर्यवंशी ( हदगांव तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी शिक्षक सेल),अतिन्द्र कट्टी (मानद वन्यजीव रक्षक नांदेड),व्ही. एन. झगडे सर ,दवणे सर, देवडे सर,राचोटकर मॅडम,काशीनाथ रावते सदानंद सोनाळे पत्रकार, इत्यादी मान्यवरासह आदर्श विद्यालय मनाठा,जि.प.केंद्रीय प्रा.शाळा मनाठा येथील विद्यार्थी, विद्यार्थीनीनी हजेरी लावली होती .
वनविभागाने सर्व मान्यवरांचा नैसर्गिक पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मानवी जीवनात वन्यजीव ,वृक्ष संवर्धन, वृक्ष संगोपण किती महत्वाचे आहे. या बाबत अतिन्द्र कट्टी(मानद वन्यजीव रक्षक नांदेड) व वनपाल एस.बी सालमेट्टी यांनी वन्यप्राण्याचे सचित्र फोटो शेशन दाखवून सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक प्राण्यांच्या अन्नसाखळी विषयी माहिती सांगीतली. मनाठा परिसरात 600/हेक्टर मध्ये राखीव वन असुन, त्यात बिबटे, लाडंगे, कोल्हे, रोही, रानडुकरे, वानर, हरीण, इत्यादी सह सरपटणारे प्राणी अजगर, धामण,कोब्रा नाग, परड, घोणस, आढळतात. तसेच विविध पक्षाचा या राखीव वनात रहिवास आहे.
या सर्व वन्यजीवाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येक नागरीकाची आहे. ग्लोबल वार्मींग मुळे प्रथ्वीचे तपमान झपाट्याने वाढत असुन अवकाळी पाऊस, गारपिट,चक्रिवादळ, कोरडा दुष्काळ ,इत्यादी संतुलन राखायचे असेन तर वृक्ष संवर्धन मह्त्वाचे आहे. असे प्रतिपादन संजय पाटील सुर्यवंशी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हि. एस. गोरलावाड (वनपाल) मनाठा, एच डी.गवळी (वनरक्षक)मनाठा, एस.बि.वाघमारे (वनरक्षक चाभरा),एस.एस.पंचलीगे (वनरक्षक सावरगाव),पि.डी. चाटसे ( वनरक्षक चोरंबा नांदेड),शहाबोद्दीन पठाण, सोनबा सोनाळे (वनमजुर)यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील सुर्यवंशी (अध्यक्ष संयुक्त वनव्यवस्थापण समीती मनाठा)यांनी केले. तर आभार श्री व्हि.एस. गोरलावाड (वनपाल मनाठा)यांनी मानले सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून चहा पाण्या नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.