हंडरगुळी, उदगीर, लातूर,विठ्ठल पाटील। गाय,म्हैस, शेळी,मेंढी व बैलांसह फॅंन्ड्रीची वाहतुक करणा-या टमटम,टेम्पो मधुन शालेय विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालुन अवैधरित्या व खुलेआमपणे विद्यार्थ्यांची वाहतुक होताना दिसते.माञ सं.आ.टी.ओ. व शिक्षण विभागाला हा गोरख धंदा दिसत का? नाही.का संबंधित खाते ( आरटीओ=शिक्षण अधिकारी ) हे “कोमात” गेले आहेत का?असे प्रश्न जाणकार जनतेतुन चर्चीले जातात. तसेच याबद्दल कांही महिण्यापुर्वी पेपरबाजी झाली होती.तेंव्हा वाढवणा येथील कर्तबगार A.p.i.भिमराव गायकवाड यांनी अधिक्रत स्कुल बस नसलेल्या शाळांना नोटीसा दिल्या होत्या.म्हणुन कांही दिवस ही वाहने बंद दिसत होती.
पण नंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या या म्हणी प्रमाणे या गावातील त्या शाळांनी पुन्हा एकदा स्टूडंट ट्रॅव्हल परमिट नसलेली तसेच ईन्सुरंन्ससह अन्य कागदपञे नसलेले व फॅंन्ड्री सह अन्य गुरांची वाहतुक करणा-या टेंम्पो मधून बाल विद्यार्थी यांची वाहतुक जोमात सुरु झाल्याचे दिसते.या वाहणांचा अपघात झालाच तर विद्यार्थ्यांना विमा पाॅलिशी मिळेल का? वर्षाकाठी शासनासह पालकांचे खिसे रिकामे करुन लाखों रुपये स्वत:च्या घशात घालणा-या येथील संस्थाचालकांनी परवानाधारक वाहन घेण्याऐवजी गुरांची वाहतुक करणारी वाहने भाड्यानी घेतले असुन याच्या भाड्यासाठी सेवकांकडून वार्षीक 10 हजार संस्थेतर्फे मु.अ. {प्राचार्य} घेतात.
अशी कुजबूज ऐकू येते.सं. आरटीओ व शिक्षण अधिकारी कमजोर पडल्यानेच विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीस जोर आला आहे. एजुकेशन परमिट नसलेली असंख्य गाड्या म्हणजे गुरांची वाहतूक करणारे टेंम्पो मोठ्या शाही रुबाबात विद्यार्थ्यांची वाहतुक करतातच.कसे? व कुणाच्या आर्शीवादाने.? कारण आजवर अन्य गाड्या अडवुन या – ना त्या कारणाने कारवाई केली जाते.पन हंडरगुळी ता.उदगीर येथे विद्यार्थ्यांची अवैधरित्या वाहतूक करणा-या एका पण गाडीवर आजवर एकदाही व एकाही (आरटीओ,शिक्षण} खात्याचे अधिका-यानी कारवाई केली नाही.
का? संबंधितांमध्ये धाडस नाही का ? तेंव्हा अशा वाहनांवर कारवाही कोण व कधी ? करणार.अपघातात एखादा बळी गेल्यावर का?तसेच पालकांना स्वत:चे मुल,लेकरु “प्रिय” नाही.का? असेल तर स्कुल बस ऐवजी गुरांची वाहतूक करणा-या पाॅलिसी व अन्य कागदपञं नसलेल्या टेंम्पोतुन मुलांना ये-जा का करु देतात?या सारखे प्रश्न जाणकार शिक्षणप्रेमीं जनतेतून चर्ची- ले जातात.तेंव्हा याकडे कर्तबगार एस.पी.सोमयजी मुंडे,Api भिमराव गायकवाड यांनीच याबाबत काय तो “फैसला” करावा.व बालकांचे “प्राण” वाचवावेत.अशी अपेक्षा जनतेतुन व्यक्त केली जात आहे…