नांदेड| हदगाव येथील उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या उपस्थितीत दि.२८ डिसेंबर रोजी पंचायत समितीच्या सभागृहात हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील पोलीस पाटलांच्या १०१ रिक्त पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. हदगाव तालुक्यातील ६५ आणि हिमायतनगर तालुक्यातील ३६ पोलीस पाटलांच्या रिक्त पदासाठी सोडत काढण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी गावनिहाय आरक्षण काढले. १९ गावांतील पोलीस पाटीलांच्या भरतीसाठी ईश्वर चिठ्ठी काढण्यात आल्या. त्यामध्ये ६ गावे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली. यात दिग्रस, शिऊर, बामणी, वडगाव (बु), वरवट, या ६ गावांचा समावेश आहे. तर अनुसूचित जातीतील पुरुषांसाठी तेरा गावांसाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये कंजारा, ल्याहारी, रावणगाव, पांगरी, डोल्हारी, डोंगरगाव, कोठा (ज.) ता. हिमायतनगर, कांडली (खु), कोपरा ही गावे अनुसूचित जातीतील सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली आहेत.
हिमायतनगर तालुक्यातील अनुसूचित जमातीसाठी पोलीस पाटलांची ११ पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. गावनिहाय आरक्षण करण्यात आले. त्यातील ३ जागा महिलांसाठी आणि ८ जागा पुरुषांसाठी आरक्षीत आहेत. महिलांसाठी महादापूर ता. हिमायतनगर, हाळेगाव-माळेगाव, बानवाडी तर अनुसूचित जमातीमधील सर्वसाधारण प्रवर्गासाठी ठाकरवाडी, राळावाडी, धन्याचीवाडी, कुसळवाडी, चिचोडर्डी ता. हिमायतनगर, गवतवाडी, तरोडा आणि वाळकेवाडी ता हिमायतनगर या गावांचा समावेश आहे. यानंतर विमाप्र या प्रवर्गातील एकूण ३ पोलीस
पाटीलांची पदे स्थानिक चौकशीनुसार लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमानुसार लावून निश्चित करण्यात आली. यानंतर विशेष मागास प्रवर्गाच्या ३ पैकी १ पद महिलांसाठी निश्चित करण्यात आले. यावेळी सोडतीनुसार जगापूर हे विमाप्र महिलांसाठी राखीव तर विमाप्र सर्वसाधारण (पुरुष) प्रवर्गासाठी खरटवाडी व चोरंबा ही गावे आरक्षीत करण्यात आली. यानंतर विजाअ प्रवर्गासाठी एकूण ४ पोलीस पाटीलांची पदे स्थानिक चौकशीनुसार लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमानुसार लावून निश्चित करण्यात आल्या, परंतु सर्वात वर असलेल्या किनाळा तांडा, रमणवाडी, वडगाव तांडा, बोरगडी तांडा, पवना तांडा या पाच गावच्या लोकसंख्येची टक्केवारी समान असल्याने ५ पैकी ४ गावांची ईश्वर चिठ्ठी बालकाच्या हस्ते काढण्यात आली. त्यानंतर विजाअ प्रवर्गाची ४ पैकी रमणवाडी या गावचे एक पद महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले.
यानंतर भटक्या जमाती ब या प्रवर्गातील एकूण पोलीस पाटीलांची पदे स्थानिक चौकशीनुसार निश्चित करण्यात आली. यातील पिंगळी गावचे पोलीस पाटील पद भटक्या जमाती च प्रवर्गातील महिलांसाठी आरखीत करण्यात आले. टाकळगाव, बोरगडी, शिबदरा ता. हिमायतनगर या ३ गावच्या पोलीस पाटीलांची पदे भज व प्रवर्गातील सर्वसाधारण (पुरुष) गटासाठी आरक्षीत करण्यात आले.
भज ड या प्रवर्गासाठी तीन पोलीस पाटीलांची पदे आरक्षीत करण्यात आली. त्यापैकी कवाना या गावच्या पोलीस पाटीलाचे पद महिलासाठी सोडती द्वारे आरक्षीत करण्यात आले, वाघी व खडकी या गावची पदे भज ड प्रवर्गात सर्वसाधारण पुरुष गटासाठी आरक्षीत करण्यात आली. इतर मागास प्रवर्गासाठी २० पोलीस पाटीलांची पदे निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी ६ पदे महिलांसाठी सोडती द्वारे गुरुवारी आरक्षीत करण्यात आली, तसेच बेलगव्हाण, पार्टी (ज), कलां (म.) जवळगाव, हस्तरा व चक्री या ६ गावच्या पोलीस पाटलांची पदे इतर मागास प्रवर्गातील सर्वसाधारण पुरुष गटासाठी सोडती द्वारे आरक्षीत करण्यात आली. याशिवाय ओबीसी प्रवर्गातील सर्वसाधारण पुरुष गटासाठी निवळा, जांभळा, मंगरूळ, सोनारी,
टाकराळा, धानोरा (ता.) ता. हदगाव, दगडवाडी, नाव्हा, चिंचगव्हाण, टेंभी, कांडली (बु), वाळकी (बु), कृष्णापूर, व सवना ही १४ गावच्या पोलीस पाटलांची पदे ओबीसी प्रवर्गातील सर्वसाधारण पुरुष गटासाठी आरक्षीत करण्यात आली. ई डब्ल्यू एस प्रवर्गासाठी १० गावे आरक्षीत करण्यात आली. यात ३ गावातील पोलीस पाटीलांची पदे महिलांसाठी आरक्षीत करण्यात आली. यामध्ये चेंडकापूर, वाकी, पावनमारी हे तीन गावे महिलांसाठी आरक्षीत करण्यात आली. तसेच सर्वसाधारण गटासाठी निमटोक, सिल्लोडा, पिपराळा, पवना, उंचाडा,
तळेगाव, केदारगुडा या ७ गावांचा समावेश आहे. याशिवाय २४ गावे राखीव सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी सोडण्यात आली. यातूनही सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ७ गावच्या पोलीस पाटीलांची पदे आरक्षीत करण्यात आली आहेत. १७ गावच्या पोलीस पाटीलांची पदे सर्व साधारण पुरुष प्रवर्गासाठी खुली ठेवण्यात आली आहेत. यामध्ये गोलेगाव, वडगाव (खु), गुरफळी, हडसनी, तळ्याचीवाडी, रुई, इंरापूर ही गावे महिलासाठी राखीव ठेवण्यात आली. तसेच पारवा खुर्द, महातळा, कारला, आमगव्हाण, बळीराम तांडा, दुघड, वीरसनी, पारवा बु., बोरगाव, बोरगाव तांडा, वडगाव तांडा, मनूला बु., वाशी, उंचेगाव खु., उंचेगाव बु. लिंगापुर ही १७ गावे सर्वसाधारण पुरुष गटासाठी खुली ठेवण्यात आली आहेत.