नांदेड। शिवा कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने सामाजिक बांधिलकी च्या जाणिवेमधून गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रम नुकताच नांदेड शहरातील कुसुम सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे होते.
अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषण करताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी भविष्यात गुणवत्तेबरोबरच स्वतः आत्मनिर्भर होऊन स्वंयरोजगार निर्माण करणारे विविध कौशल्य आत्मसात करुन स्वयंसिद्धी प्राप्त करावीच लागेल. उद्घाटक श्रीकृष्ण कोकाटे (आयपीएस) जिल्हा पोलिस अधिक्षक , श्रीकृष्ण कोकाटे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे अपयशाला घाबरून न जाता सतत अभ्यास करावा अनेक आयपीएस, आयएएस अधिकारी बारावी नापास झाले होते. पण सातत्य ठेवल्यामुळे आज ते कार्यरत आहेत यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा माझ्याही जिवनात अपयश आले. परंतु सातत्य ठेवल्यामुळे मी आज आय पी एस अधिकारी आहे त्यामुळे आपणही अभ्यासात सातत्य ठेवून यश मिळवावे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
डॉ.गोविंद नांदेडे [पुर्व शिक्षण संचालक महाराष्ट्र शासन] यांनी केलेले मार्गदर्शन गुणवंताना अतिशय प्रेरक , उत्साहवर्धक आणि उर्जा वृदधीगंत करणारे ठरले . प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अरविंद पांडागळे [सहयोगी प्राध्यापक कृषी विद्यापीठ परभणी, ] विठ्ठल ताकबिडे , [राज्य सरचिटणिस शिवा कर्म महासंघ ] .डॉ विभूते यांनी गुणवंताना शुभेच्छा संदेश दिला प्रमुख पाहुणे मा दशरथ पाटील [संचालक आयआय बी ] वैजनाथ तोनसुरे [ राज्य उपाध्यक्ष शिवा संघटना, ] धन्यकुमार शिवणकर [राज्य सरचिटणीस शिवा संघटना, ] संजय बेळगे [मा. शिक्षण सभापती , ]संजय कोठाळे [मराठवाडा अध्यक्ष कर्मचारी महासंघ, ] केशव मालेवार [प्रसिद्ध उद्योजक ],दिगंबर मांजरमकर जिल्हा अध्यक्ष उत्तर, विरभद्र बसापुरे जिल्हा अध्यक्ष दक्षिण, रविंद्र पांडागळे जिल्हा सचिव उत्तर, संभाजी पावडे जिल्हा सचिव दक्षिण डॉ सोमनाथ पचलिंग हे उपस्थित होते .
जिल्ह्यातील वीरशैव -लिंगायत समाजातील जाती व पोट जातीतील समाज बांधवांची उपस्थिती होती . कार्यक्रम यशस्वीतेसाठी जी .एस.मंगनाळे, प्रा. रामकिशन पालीमकर, मोहण लंगडापुरे, विजय होपळे , ज्ञानेश्वर घोडके, प्रमोद पाटील, निळकंठ चोंडे ,दत्तप्रसाद पांडागळे , शिवाजी कहाळेकर,शिवकुमार नागठाणे, मोहन लंगडापुरे , वसंत जारीकोटे, शिवकुमार देशमुख . संजय वाकोडे, सिध्देश्वर मठपती, हिमगीरे डी. डी. देविदास टाले, शिवराज पत्रे, शिवहार कलुरे, रमाकांत पाटील, सतीश पाटील, बालाजी पांडागळे, विठ्ठल मुखेडकर , मनोहर पेटकर, यादवराव एकाळे , राम भातांब्रे,गुणवंत मांजरमकर ,संतोष डोणगावे , विश्वनाथ कोळगीरे, नागनाथ बडुरे ,एन एम गाबणे, विठ्ठल मुखेडकर ,सहदेव कापसे ,धोंडिबा पांडागळे, शंकर हसगुळे, कैलास मंगनाळे, चक्रधर हाळेघोंगडे, विश्वनाथ पाटील, विजय आमटे . संजय अकोले , वैजनाथ पसरग बालाजी अर्धापूरे,संजय गंजगुडे आदी शिवा कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नांदेड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दिगंबर .मांजरमकर यांनी केले तर सुञ संचलन प्रा धाराशिव शिराळे व आभार सचिव संभाजी पावडे यांनी मांडले. .