
नांदेड| ऑक्टोबर 2023 पासून सुरु असलेल्या मराठा आरक्षण मागणीच्या पाठिंब्यासाठी सुरु करण्यात आलेल्या साखळी उपोषणाची सांगता आज ह.भ.प.श्री शिवाजी महाराज देशमुख यांच्या कीर्तनाने अन्नप्रसाद घेऊन करण्यात आली आहे.
मराठा समाजाचा OBC प्रवर्गात समावेश करून सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत. या प्रमुख मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यासाठी दि.29 ऑक्टोबर 2023 रोजी जिजाऊनगर वाडिपाटी येथे सुरु केलेले साखळी उपोषण हे आज 57 व्या दिवशी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या मार्फत राज्यस रकारला निवेदन देऊन तात्पुरतं स्थगित करण्यात आले आहे.
यावेळी सदरील साखळी उपोषण सुरु करणारे 17 गावातील व सहकार्य करणाऱ्या एकुण 40 गावातील सर्व समाज बांधव उपस्थित होते. आज ह.भ.प.श्री शिवाजी महाराज देशमुख यांच्या कीर्तनाने सांगता करीत अन्नप्रसाद घेऊन साखळी उपोषणाची सांगता करण्यात आली. अशी माहिती मराठा सेवक श्याम वडजे पाटील यांनी दिली.
