नांदेडसोशल वर्क

जोपर्यंत रस्त्याचे काम मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा ग्रामस्थांचा इशारा

हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील एकंबा – सिरपल्ली – डोल्हारी – पळसपूर – हिमायतनगर रस्त्याचा अर्धवट काम ठेऊन गुत्तेदाराने पलायन केल्यामुळे सर्वसामान्य नागरीकातून संबंधित ठेकदाराविरुद्ध जनप्रक्षोभ वाढला आहे. वारंवार सूचना देऊनही काम पूर्ण करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अखेर एकंबा – सिरपल्ली – डोल्हारी – पळसपूर – हिमायतनगर येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाचा तिसऱ्या दिवशी श्री परमेश्वर मंदिर कमेटीसह अनेकांनी भेट देऊन विचारपूस केली. मात्र वृत्त लिहीपर्यंत अभियंत्याने भेट दिली नसल्याचे उपोषणकर्त्यानी सांगितले. दरम्यान दूरध्वनीवरून अनेक नेत्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला मात्र जोपर्यंत काम सुरु होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

नांदेड – यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील एकंबा – सिरपल्ली – डोल्हारी – पळसपूर – हिमायतनगर – पार्डी – एकघरी या ११.९९० किमी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ७३० लक्ष रुपयांच्या निधी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर दि. ७ जानेवारी २०२२ ला खासदार हेमंत पाटील आणि आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते सदरील रस्ता कामाला सुरुवात झाली होती. एव्हडेच नाहीतर पुन्हा ५ वर्ष या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५० लक्ष रुपयाचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. सदरील काम ठेकेदार में एम एस सिद्दीकी, औरंगाबाद यांच्यामार्फत एका सब ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम संत गतीने आणि निकृष्ट पद्धतीने केल्यामुळे २ वर्षाचा कार्यकाळ उलटला अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण ना करता ठेकेदाराने पलायन केल्याचे बोलले जात आहे.

परिणामी या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे, दबाई केलेल्या रस्त्याची गिट्टी उखडून अनेक ठिकाणी खड्डेमय अवस्था झाली असल्याने रस्त्याने ये जा करताना नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो आहे. आत्तापार्यंत या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अनेक अपघात झाले असून, एका महिलेचा जीवदेखील गेला आहे. असे असताना या भागाचे सबंधित अभियंता सदरील रस्त्याचे काम पूर्ण करून घेण्यात का…? चालढकल करत आहेत. असा सवाल पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, हिमायतनगर सह या भागातील विविध गावच्या नागरिकांनी उपस्थित केला आहे. तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करून द्या अशी मागणी लावून धरत नागरिक शेतकऱ्यांनी गेल्या दोन दिवसापासून उपोषण सुरु केले आहे.

मागील वर्षी याच कामात अनियमितता दिसून येत असल्याची तक्रार गावकर्यांनी करून निकृष्ट कामाची पोलखोल केली होती. नागरिकांनि केलेल्या तक्रारीनंतर रस्त्याकामासाठी वापरण्यात आलेले मटेरियल रद्द करण्यात आले. काही दिवस ठेकेदाराने काम बंद ठेऊन देखरेख करणारे तत्कालीन अभियंता सुधीर पाटील यांच्या आशीर्वादाने रद्द केलेल्या गिट्टीचा पुन्हा वापर करून थातुर माथूर रस्ता करण्याचा घाट रचला होता. यास ग्रामस्थांचा विरोध होय असल्याचे लक्षात आल्यानंतर ठेकेदारने रस्त्याचे काम अर्धवट ठेऊन पलायन केल्याने आजघडीला ७.३० कोटीच्या रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्यामुळे या भागातील नागरिक, शेतकऱ्यांना ये- जा करताना मोठ्या अडचणीतून मार्ग काढावं लागतो आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावर चिखल होत असल्याने अनेकांची घसरगुंडी होते आहे. त्यामुळे रस्त्याचे काम जोपर्यन्त पूर्ण केले जात नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवण्याचा इशारा डॉक्टर मनोज राऊत डोलारीकर , नागोराव शिंदे पळसपुरकर , गंगाधर गायकवाड दिघीकर , शेषराव वाघेकर ,साहेबराव  कदम डोलारी , बंडू उर्फ विठ्ठल आनंदराव पवार  गावकर्यांनी दिला आहे.     

ठेकेदाराच्या मुजोरीपणामुळे हिमायतनगर सिरपल्ली रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. कामाची संत गती आणि गुत्तेदार अभियंता यांची राजकीय नेत्याकडून होत असलेली पाठराखण यामुळे रस्त्याचे काम अर्धवट ठेवून गुत्तेदाराने मनमानी कारभार करत आहे. रस्त्याचे काम पूर्ण होऊन देखरेख तारीख यामुळे उखडलेल्या रत्स्यावर अनेक अपघात होत असून, रस्ता कामाची गुणवत्ता देखील ढासळली आहे. करण्यात आलेल्या अर्धवट थातुर माथूर पंतप्रधान ग्रामसडक रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी करून गुत्तेदारावर दंडात्मक कार्यवाही करून ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकून अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम चांगल्या गुत्तेदारांमार्फत पूर्ण करून द्यावे अशी प्रतिक्रिया भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांनी केली.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!