नवीन नांदेड। आगामी होणा-या लोकसभा निवडणुक अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सिडको परिसरातील कुसुमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मतदान केंद्राची पाहणी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी १ मार्च २४ रोजी केली.

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणूक २४ संदर्भात सिडको परिसरातील पाच किंवा जास्त मतदान केंद्र असलेल्या ईमारत मतदान केंद्रची पहाणी केली, यात कुसुमताई विघालय, सिडको इंदिरा गांधी विघालय हडको,शिवाजी विघालय सिडको,बळीरामपुर जिल्हा परिषद शाळा यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी इतवारा सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या सह गोपनिय शाखेचे दंतापले,टरके बाला प्रसाद यांच्यी उपस्थित होते. ईतवारा नांदेड पोलीस स्टेशन हद्दीत ही मतदान केंद्र पाहणी केली.

