धर्म-अध्यात्मनांदेड

श्री शनि मंदिर व श्री संकट मोचन हनुमान मंदिर हडको येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन

नवीन नांदेड। श्री शनि मंदिर देव व श्री संकट मोचन हनुमान मंदिर देवस्थान, इंदिरा गांधी गृहनिमार्ण सोसायटी, हडको नांदेड येथे श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने मंगळवार २३ एप्रिल २०२४ धार्मिक कार्यक्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की, याही २१ व्या वर्षी श्री संकटमोचन हनुमान जयंती सोहळा २३ एप्रिल २०२४ रोजी मंगळवार सकाळी ५:३० वा. दहि दुधाचा सामुदायीक महाअभिषेक. गुरु शशिकांत महाराज यांच्या अधिपत्या खाली संपन्न होणार आहे. त्यानंतर हनुमान चालीसा व श्री शनि चालीसाचे वाचन,महाआरती, अजिवन अधिक यजमान शिवसांब आनेराव, रंगनाथराव आष्टुरकर करणसिंह ठाकुर,कै.सदाशिव बंडेवार, श्रीकांत शेषेराव देशपांडे, गंगाधर नागनाथ चालीकवार यांचा दस्ती नारळ देवून सन्मान करण्यात येणार आहे.

ब्रम्हपत्र,श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्य भावार्थ रामायनातील ब्रम्ह पत्राचे वाचन सदरील ब्रम्ह पत्रात हनुमानजी सिता शोधेसाठी लंकेत जाऊन शोध घेतात व शोध घेत असतांना रावनाच्या लंकेत जाऊन अशोक वनाचा विध्वंस करतात व नंतर पुर्ण लंका जाळून खाक करतात राक्षसांना सळो की पळो करून सोडतात व परत प्रभु श्रीरामचंद्राकडे येत असताना श्रीराम प्रभुने विचारले सिता शुध्दी कसी केली, म्हणुन तर आपण काय केलो सांगावे म्हणून ब्रम्ह देवाने सर्व हक्कीगत पत्रात लिहून दिली व त्या ब्रम्ह पत्राचे वाचन लक्ष्मणाने सर्व वानर सैन्याच्या समोर वाचन केले याचे सविस्तर कथा सदरील ब्रम्ह पत्रात असुन याचा लाभ सर्व रामभक्ताने घ्यावा असे आवाहन केले जाते आहे.

ब्रम्हपत्र सोमवार, दि. १५ ते २३ एप्रिल वेळ दु. ३ ते ५ पर्यंत तर
दि. २३/०४/२०२४ रोजी समाप्ती वाचक सौ. शिवकला रमेशराव पाटील सौ.आशा संजयराव जोशी सुचक ह.भ.प.विठ्ठलराव गिते गोळेगावकर, ह.भ.प.सुरेशराव कल्याणकर, ह.भ.प. बळीराम कापावार हे असणार आहेत.

अजिवन अन्नदाते यांच्या हस्तेप्रसादाचे वाटप दुपारी १२ वाजता होईल. सामुदायीक महाअभिषेक २३.एप्रील २४ रोज मंगळवार सकाळी ०५:३०वा. अभिषेक शुल्क १००/-रु. महाप्रसाद (भंडारा) दि. २३.०४.२०२४ रोज मंगळवार दुपारी १२ वा.ब्रम्हपत्र पुजेचे यजमान व पुलाव (प्रसाद वाटप) सौ. अश्विनी मयुर ठाकुर यांच्या तर्फे वाटप होणार आहे, धार्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे दानशूर पवन देविलाल गुरुखुदे जिल्हा अध्यक्ष ,महाराष्ट्र गवळी समाज संघटना यांचा देवस्थान तर्फ सत्कार करण्यात येणार आहे.

या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करणसिंह ठाकुर (सिडको भुषण) अध्यक्ष,  गोपिनाथराव कहाळेकर, कोषाध्यक्ष माधवराव कदम सेक्रेटरी, संजय जाधव पाटील बांधकाम प्रमुख व समिती सदस्य आर.किशनराव बाळासाहेब चव्हाण,त्र्यंबक सरोदे, दत्तात्रय सागुरे, कै.गोविंद मेटकर, शिवाजी आढाव देवबा कुंचेलीकर, प्रा.अशोक मोरे,निवृत्तीराव जिंकलवाड किशोर देशमुख,खुशाल कदम यांनी केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!