Acvident News ; दोघा मेहूण्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू ; किनवट – माहूर मार्गावरील घटना

श्रीक्षेञ माहुर, कार्तिक बेहेरे। तालुक्यातील पानोळा येथील दोघे मेहुणे हे विदर्भातील पांगरी येथे दर्शनासाठी गेले होते दर्शन आटोपुन ते त्यांच्या दुचाकी क्रं.एम. एच २९ एफ १२४२ ने घराकडे जात असताना असोली ते उमरा फाट्यादरम्यान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उडविल्याने अक्षरशा त्या दोघा पैकी एकाचे डोके तर एकाचा एक अडंग चेंदामेंदा झालेल्याची घटना दि.३ रोजीच्या रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली आहे.
पानोळा येथील दोघे मेहुणे हे अर्णी तालुक्यातील पांगरी येथील महादेव मंदीर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपुन प्रकाश परसराम जाधव वय ५२ व भारत धनसिंग राठोड वय ५५ हे वडसा मार्गे पानोळा त्यांच्या घराकडे जात असताना रात्री अंदाजे १० वाजताच्या सुमारास उमरा ते आसोली फाटा दरम्यान त्यांच्या दुचाकीस अज्ञात वहाने उडविल्याची घटना घडल्याची माहिती मिळताच त्यांना रुग्णवाहिकेतून माहुर येथिल ग्रामीण रुग्णालय दाखल केले असता, तेथे डॉ.अक्षय सांगळे यांनी दोघांनाही मयत घोषित केले.
अपघात एवढा भिषण होता की, मयत प्रकाश परसराम जाधव यांचे डोके धडावेगळे तर दुसरे मयत भारत धनसिंग राठोड यांचे एक अंडग चेंदामेंदा झाल्याने दोघांचे देह अस्तवेस्त अवस्थेत घटनास्थळी पडुन होते. घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलिस ठाण्याचे फौजदार रमेश जाधवर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
