Shivmahapuran katha successful ; अद्वितीय, अलौकिक, अविस्मरणीय, अद्भुत श्रीशिव महापुराण कथेची यशस्वी सांगता; हजारो साधू संतांची उपस्थिती
सात दिवसात जवळपास १४ लाख भाविकांनी घेतला कथा,कीर्तन, व महाप्रसादाचा लाभ; ११ हजार भाविक भक्तांची आरोग्य तपासणी; १०० क्विंटल बुंदीचा शुद्ध देशी गायीच्या तुपातील महाप्रसाद; १०८ कुंडी विश्वशांती श्री दत्त यागाचा २८०० दांपत्यांनी घेतला लाभ; हिंदु धर्मातील शैव, वैष्णव व दत्त पंथीय या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र; राजवाडी ते येवली तांडा जाणाऱ्या रस्त्यावर ६ किलोमीटर पर्यंत दुतर्फी वाहनांच्या रांगा; राजकीय नेत्यांनी अध्यात्मिकता जोपासा -गोवत्स व्यंकट स्वामी महाराज

भोकर/हिमायतनगर। गंगाधर पडवळे। पिंपळगाव येथील दत्त संस्थान च्या वतीने आयोजितकेलेल्या श्री शिवमहापुराण कथा सोहळा आणि १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग याज्ञ सोहळ्याचे आयोजन दि. ६ ते १३ मार्च दरम्यान करण्यात आले होते. या सोहळ्या दरम्यान सुमारे २८०० दाम्पत्यांनी विश्वशांती दत्त याग मध्ये सहभाग नोंदवला. तर यावेळी दरोरोज जवळपास एक लाख भाविक महाप्रसादाचा लाभ घेत होते. या सप्ताहामध्ये ११ हजाराहून अधिक भाविक भक्तांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली आहे. उपस्थित भाविकांनी येथील अध्यात्मिक आनंदासह महाप्रसादाचाही आस्वाद घेतला. गुरुवारी बाल योगी गजेंद्र महाराज यांच्या काल्याच्या किर्तनासाठी विदर्भ मराठवाड्यासह शेजारील तेलंगना, आंध्र प्रदेश व कर्नाटकातून प्रचंड मोठया संख्येने भाविक दाखल झाल्याने भव्य दिव्य मंडप टाकूनही मंडपात अनेकांना जागा अपुरी पडत असल्याने मंडपाबाहेर बसूनही कीर्तन श्रवण करून श्रावण भक्तीचा आनंद घेत भाविक टाळ्यांसह हरि नामाचा जयघोष करीत होते.
प्रचंड गर्दी असल्याने स्थानिक आमदार बाबुराव कदम कोहळीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडपकर, बाबुराव कदम व असंख्य स्वयंसेवक यांच्या मदतीने वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. तर आमदाराचे स्वीय सहाय्यक बबनराव कदम हे स्वच्छता मोहिमेच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. महाप्रसादाचे व्यवस्थापन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शन व देखरेखे खाली काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी डॉक्टर राजेंद्र वानखेडे व असंख्य स्वयंसेवकांनी पार पाडले.
सर्व कार्यक्रमाचे सुनियोजन करण्यात खासदार नागेशदादा पाटील आष्टीकर, माजी खासदार सुभाष वानखडे यांचा मोलाचा वाटा आहे.या कार्यक्रमासाठी उज्जेन, श्रीशैल, केदारनाथ येथील जगद्गुरु, मालूक पिठाधीश्वर, तथा कथाकार प. पु. राजेंद्रदास जी महाराज यांच्यासह, धिरेंद्र शाश्त्री बागेश्वर धाम, राधाकृष्ण जी,छोटे सरकार, माता कणकेश्वरी जी, यांच्यासह आयोध्या, मथुरा, गोकुळ, वृंदावन, कशी, प्रयाग राज, चित्रकूट, केदार, उज्जेन, श्री शैल्य, उत्तराखंड, अनेक शिवाचार्य, महंत, साधू, संत,ष. ब्र., ह. भ. प.हे उपस्थित होते.
मलूक पिठाधीश्वर, तथा कथाकार प. पु. राजेंद्रदास जी महाराज यांच्या अमोघ वाणीतून ६ मार्च पासून श्रीक्षेत्र पिंपळगाव ता. हदगाव येथे सुरू झालेल्या शिव महापुराण कथेची व कीर्तन सोहळा यांची यशस्वी सांगता बालयोगी गजेंद्र महाराज मघापुरी यांच्या काल्याचे किर्तनाने करण्यात आली. यावेळी ते म्हणाले की आजच्या पिठीला जर चांगल जीवन जगायचे असेल तर प्रत्येकाच्या घरासमोर एक तरी गाय बाळगायला शिका, गोरक्षा करा, तरच आपला धर्म, आपली संस्कृती, आणि आपलं ऐश्वर्यात भर पडेल.
तर आशिर्वचन पर बोलताना पिठाधीश्वर व्यंकट स्वामी म्हणाले की राजकीय पुढऱ्यांनी आपल्यात सर्वप्रथम आध्यत्मिकता वृद्धिंगत केली पाहिजे त्यामुळे देव, देश, धर्म टिकेल असे कार्य आपल्या हातून घडेल व आपसूकच पुण्याचे काम झाल्याने आपले जीवन सार्थकी लागेल. धर्माला राजश्रय, व राजाला धर्माची जोड असल्याशिवाय धर्म वाढू शकत नाही व टिकूही शकत नाही. त्यामुळे सर्व राजकीय लोकांनी अध्यात्मकडे वळा व आपल्या जीवनाचे सोन करून घेण्याचा सल्ला ही यावेळी दिला.तर या सोहळ्यात विशेष म्हणजेच तिन्ही पंथाचे शैव, वैष्णव, आणि दत्त पंथीय एका दिलाने एका मनाने तन, मन, धन लावून अगदी हसत खेळत भक्तिमय वातावरणात काम करतांना दिसत होते कोणीही भेदभाव, उच्च निच्च असं करतांना आढळून आलं नाही.
पिंपळगाव येथील दत्त संस्थान च्या वतीने आयोजित महापुराण कथा सोहळा आणि १०८कुंडी विश्वशांती दत्तयाग याज्ञ सोहळ्याचे आयोजन दि. ६ ते १३ मार्च दरम्यान करण्यात आले होते. या सोहळ्या दरम्यान सुमारे २८०० दाम्पत्यांनी विश्वशांती दत्त याग मध्ये सहभाग नोंदवला.ऐन उन्हाळ्यात हा धार्मिक कार्यक्रम होत असल्याने प्रशासन यावर बारकाईने लक्ष ठेवून होत त्यामुळे जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रामेश्वर भाले व त्यांच्या टीमने अतिशय सुनियोजन करून एकाही भक्ताला कुठलाच त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी घेत कथा स्थानी दवाखाना, ऍम्ब्युलन्स ची व्यवस्था करून येथे कथेसाठी व कीर्तन सोहळ्यात सहभागी झालेल्या जवळपास ११ हजार भाविक भक्तांची आरोग्य तपासणी केली गेली.
उपस्थित भाविकांनी येथील अध्यात्मिक आनंदासह महाप्रसादाचाही आस्वाद घेतला. गुरुवारी गजेंद्र महाराज यांच्या काल्याच्या किर्तनासाठी विदर्भ मराठवाड्यासह शेजारील तेलंगना, आंध्र प्रदेश व कर्नाटकातून प्रचंड मोठया संख्येने भाविक दाखल झाल्याने मंडपात अनेकांना जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे मंडपाबाहेर बसूनही श्रवणीय कीर्तनाचा आनंद घेत भाविक टाळ्यांसह हरि नामाचा जयघोष करीत होते. सांगतेच्या दिवशी गर्दीचा अंदाज घेऊन पोलीस प्रशासनाने बंदोबस्त चौख ठेवला त्याच बरोबर पार्किंग व्यवस्था येथील स्वयंसेवकांनी अनेकठिकाणी विभागल्याने वाहनाची गर्दी पांगून रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या लोकांना त्रास होऊ दिला नाही. दररोज लाखाच्या आसपास भाविक चपाती, वरण, भात, भाजी व एक गोड पदार्थ असा महाप्रसाद घेत होते शेवटच्या दिवसाचा अंदाज घेऊन १०० क्विंटल देशी गीर गाईच्या राजस्थान येथून आणलेल्या तुपात बुंदी बनवण्यात आली होती. या कामी चारशे हुन अधिक आचारी काम करीत होते दररोज ८० ते ८५ क्विंटल पिठाची चपाती, तेवढाच तांदूळ, लागत असल्याचे मत आचारी यांनी आमच्याशी बोलतांना व्यक्त केलं.
एवढा भीषण उन्हाळा असूनही पाईप लाईन च्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी नळजोडणी करून त्यास टँकर द्वारे जोडलं गेलं होत त्यामुळे पिण्याच्या असो वा सांडपाणी, स्वच्छता गृह,स्वयंपाक करण्यासाठी पाणी कढीच कमी पडलं नाही हे वाखानण्याजोग ठरलं.सुरक्षा व्यवस्था, संतपीठ, सांधू संत आसन व्यवस्था ही अगदी नीट नेटकी त्या समिती ने ठेवून शोभा वाढवली. अद्वितीय, अलौकिक, अविस्मरणीय, अद्भुत श्रीशिव महापुराण कथेची यशस्वी सांगता झाली .असा एवढा मोठा सोहळा भव्य दिव्य संपन्न झाला कोणालाही कसलीच कमतरता पडली नाही किंवा यातकिंचितही त्रास झाला नाही हे या सोहळ्याचे खरं यश आहे.
गुरुदेवाच्या, दत्त महाराज यांच्या आशिर्वादामुळे हा भव्य दिव्य सोहळा यशस्वी पार पडला येथे काहीच कमी भासलं नाही ह्यात गोर गरीब भोळे, भाबडे भाविक यांचा फार मोठा वाटा आहे. त्याचे पैसे अतिशय चांगल्या जागी खर्च केलेत त्यामुळे त्यांना काहीच कमी पडणार नाही आमचा भरभरून आशीर्वाद आहे. या सोहळ्यासाठी सर्वांनी अतिशय मेहनत घेतली ज्याची त्याची जबाबदारी स्वयं्फूर्तीने सांभाळी म्हूणन हा कार्यक्रम एवढा उत्कृष्ट झाला यासाठी सर्व पत्रकारांचे ही मोलाचे योगदान आहे. त्यांनी ही अतिशय दर्जेदार लिखाण करून या कार्यक्रमास उत्तम प्रसिद्धी दिली. त्याचं ही धन्यवाद. या कार्यक्रमास दृश्य, अदृश्य अशा सर्वच पद्धतीने हातभार लावला गेला व यात महिला भगिनींचा मोठा वाटा आहे. – गोवत्स,बालयोगी, बाल ब्राह्मचारी प. पु. व्यंकट स्वामी महाराज पिठाधीश्वर श्री क्षेत्र दत्त संस्थांन मठ पिंपळगाव
जिथं कमी तिथं आम्ही या प्रमाणे आमची समिती काम करत होती. बापूंचा शब्द ना शब्द जपला आणि जे सांगितलं ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. याचा आम्हांला अत्यानंद आहे.याच फलित म्हणजेच हा भव्य दिव्य सोहळा याची देही याची डोळा पाहवयास मिळाला या पेक्षा अधिक काय पाहिजे. या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र भर सुरु आहे. ऍड. गुरुनाथ हनवते (ट्रस्टी श्री क्षेत्र दत्त संस्थांन पिंपळगाव)
खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, माजी खासदार सुभाष वानखडे, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी जी. प. अध्यक्षा श्रीमती शांताबाई पाटील जवळगावकर,माजी खासदार तथा विधनपरिषद आमदार हेमंत पाटील,आमदार बालाजी कल्याणकर व त्यांच्या धर्मपत्नी, आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या पत्नी सौ. सरस्वतीताई बोंढारकर, माजी आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार किशनराव वानखडे,शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सौ.शीतल भांगे पाटील,यांच्या सह अनेक पदाधिकारी, अधिकारी यांची उपस्थिती लाभली.
