उमरखेड, अरविंद ओझलवार| गावठी बनावटी पिस्टल अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडल्याची घटना उमरखेड – हदगाव रोडवरील श्रीनिवास धाब्याजवळ आज दि 23 रोजी दुपारी एक वाजता चे दरम्यान घडली .गावठी पिस्टल उमरखेड मध्ये सापडण्याची पंधरा दिवसात ही दुसरी घटना असल्यामुळे या घटनेने खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अवैध अग्निशस्त्र कारवाई संबंधाने पोलीस शोध घेत असताना उमरखेड डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल सावळे यांना येथील उमरखेड हदगाव रोडवर श्रीनिवास धाब्याजवळ दोन इसम एक्टिवा गाडीवर जात असून त्यांचे जवळ गावठी पिस्टल असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर डी बी पथक घटनास्थळावर दाखल होतात आरोपी अॅक्टिवा क्रमांक एम एच 26 सी बी 2170 या गाडीने हादगाव रोडने भरधाव वेगाने जात असताना पोलिसांनी आरोपींचा चार ते पाच किलोमीटर सिने स्टाईल पाठलाग करून सदर आरोपीस थांबून अंग झडती घेतली असता फेरोज खान अन्सार खान वय 32 रा हादगाव जिल्हा नांदेड याचे कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्टल मिळून आली.
त्याचे सोबत आरोपी मुस्ताक खॉ उर्फ राजाखबर खाँ पठाण वय 22 रा हदगाव जिल्हा नांदेड या दोघांना अटक केली तसेच एक्टिवा वाहन व गावठी पिस्टल असा एकूण 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतले त्यांच्यावर आर्म ॲक्ट 3 / 25 शस्त्र अधिनियम 1959 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड , अप्पर अधीक्षक पियुष जगताप ,उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, ठाणेदार शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली डी डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल सावळे , परिविक्षाधीन उपनिरीक्षक सागर इंगळे, संदीप ठाकूर, मोहन चाठे, अंकुश दरबस्तेवार ,अंमलदार विनोद पांडे , विशाल जाधव ,विवेक धोंगडे, नवनाथ कल्याणकर यांनी पार पाडली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगार विरोधात मोहीम पकडले असून पंधरा दिवस अगोदर महागाव रोडवर एक अग्निशस्त्र त्यानंतर बाळदी येथे तलवार व आजपर्यंत अग्निशस्त्र पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.