हदगाव, शे. चादपाशा| हदगाव शहराच्या मुख्यप्रवेश रोड व शहरातील जाणाऱ्या राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गावर शासन मान्य देशीदारु बिअरबार व बिअरशाँपीची दुकाने असल्याने यांचा ञास शालेय विद्यार्थी नागरिक व वाहनधारकांना होत असुन, याकडे माञ राज्य उत्पादनशुल्क व पोलिस प्रशासन जाणून बूजून दुर्लक्ष करित असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. या बाबतीत उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी निवेदन देवून ही काहीच उपयोग होत नसल्याने नागरिक आता हतबल झाल्याचे दिसुन येत आहे.
शहरात मुख्यरोडच्या व गजबजलेल्या परिसरात शासन मान्य देशी दारुचे दुकाने असुन, या शासन मान्य देशी दारु दुकानच्या मालकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमाँची जाणीव करुन दिली नसल्याचे स्पष्ट जाणवत आहे. कारण शहरात मुख्य रस्त्यावर या दारुड्यांचा धुमाकूळ घालतांना दररोज चित्र दिसुन येत आहे. शहरातील एक शासन मान्य दुकान तर चक्क नवीन उपविभागीय कार्यालयाच्या सुरक्षा भिंतीलाच लागून आहे. तर दुसरी माजी आमदार यांच्या जुन्या बंगल्याच्या बाजुलाच न.पा. च्या मुस्लिम मंगल कार्यालयाच्या समोर असुन, या मंगल कार्यालय मध्ये शुभकार्य आसल्यास पहील्या पंगतीत पाहुणेच्या आगोदर हे दारुडे बसतात. या मुळे नेहमी येथे दारुड्यामध्ये पाहुण्यात वाद होतांना दिसुन येतो.
राज्य व राष्ट्रीय महामार्गावर भरपुर बार व धाबे….
हदगाव शहरातुन राज्य व राष्ट्रीय महा मार्ग जात आहे. राज्य महामार्गावर नवनवीन बार व शासन मान्य देशी दारु नवीन दुकाने उघडण्यात येत आहे. तुळजापुर – नागपूर ह्या राष्ट्रीय महामार्गवर पण बिअरबार बिअर शाँपीला लगेच परवानगी मिळत आहे. तर अवैध धाब्यांची संख्या दिवसेंदिववास वाढत आहे या राष्ट्रीय महामार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. बार मधुन नशेत होऊन ग्राहक निघाला की तो थेट राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याने आपघाताची दाट शक्यता असते. या करिता या राष्ट्रीय महामार्गावर नशा करणाऱ्या ग्रहकांना वेळीच त्याच्या सुरक्षित ठिकाणी पोहचवायास पाहीजे. परंतु अस काही संबंधित बार व देशी दारुच्या संबंधिता कडुन दिसुन येत नाही. या बाबतीत शहरातील नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे सुचाना केल्या. परंतु त्या सुचनांची काडीमाञ दखल राज्य उत्पादन शुल्क विभाग नादेड कडून घेण्यात आलेले नसल्याचे निवेदनकर्त्याचे म्हणने आहे.
पोलिस व उत्पादन शुल्क विभागाच ‘समन्वय नाही…?
स्थानिय पोलिस स्टेशन व उत्पादन शुल्क विभागाच अवैध देशी दारु विक्री संबधी ‘समन्वय ‘नसल्याच स्पष्ट जाणवत आहे अवैध देशी दारु विक्री संबधी हदगाव तालुक्यातील शहरातील व अनेक गावाच्या गावकरी व महीलांनी अनेक वेळा पुराव्यानीशी निवेदने दिली. परंतु थातुर मातुर कारवाई करण्यात येते आणखीन विशेष म्हणजे पोलिस अशी कारवाई करत असतात. परंतु उत्पादन शुल्क विभाग माञ या कारवाई पासून कोसो दुर असतो. बीअर बार व शासन मान्य देशी दारुच्या दुकानाच्या स्वच्छता बाबतीत आपल्या भेटीत नेमकी काय कारवाई करतात हे सर्व फाईल मध्येच दिसुन येत आहे.