राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय भोकर येथे प्रशिक्षण संपन्न
भोकर। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अंतर्गत वयवर्षे ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना दि. ३ मार्च २०२४ रोज रविवारी भोकर शहरात २१ ठिकाणी पोलिओ लसीकरण बूथवर पोलिओ लस पाजविण्यात येणार आहे व पुढील पाच दिवस आयपीपीआय द्वारे पोलिओ लस पासून वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओ लस पाजविण्यात येणार आहे. तसेच पोलिओ जनजागरण मोहीम अंतर्गत दि.२ मार्च रोज शनिवारी सकाळी ९ वा. नुतन विद्यालय येथील विद्यार्थी, राम रतन नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थ्यांनी, हत्तीरोग कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील कर्मचारी यांच्या द्वारे भोकर शहरात प्रभातफेरी काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
माननीय डॉ. निळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड व माननीय डॉ अनंत चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनानुसार आज दि. २७ फेब्रुवारी रोज मंगळवारी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस, हत्तीरोग कर्मचारी, राम रतन नर्सिंग कॉलेज विद्यार्थी व ग्रामीण रुग्णालय भोकर येथील कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले व सविस्तर माहिती देण्यात आली.
वय वर्ष ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना दि.३ मार्च २०२४ पोलिओ लसीकरण मोहिम अंतर्गत भोकर शहरात पोलिओ लस पाजविण्यात येणार आहे सर्व पालकांनी आपल्या जवळच्या पोलिओ लसीकरण बूथवर जावून लस पाजवावी व एक ही बालक पोलिओ लस पासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अनंत चव्हाण व आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांनी केले आहे.
यावेळी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील डॉ बाळासाहेब बिर्हाडे, डॉ नितीन कळसकर, डॉ सागर रेड्डी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मनोज पांचाळ, अत्रिनंदन पांचाळ, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, संदीप ठाकूर, मल्हार मोरे, गिरी रावलोड, आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे, ईनचार्च सिस्टर सुचिता नवघडे, अधिपरीचारीका जीजा भवरे, राजश्री ब्राम्हणे, संगीता महादळे, आरोग्य सेवीका मुक्ता गुट्टे, संगिता पंदीलवाड, हत्तीरोग आरोग्य सहाय्यक व्यंकटेश पुलकंठवार, आरोग्य कर्मचारी विठ्ठल मोरे,प्रदिप गोधने, गजानन कंकाळ, संजय धुमाळे, दिलीप इंदुरकर, क्षेत्र कर्मचारी रामराव जाधव, गणेश गोदाम,इंदल चव्हाण,रवींद्र चव्हाण, राजू चव्हाण, मारोती गेंदेवाड, ज्ञानेश्वर खोकले, अंगणवाडी सेविका मदतनीस अर्चना नरवाडे, प्रणिता दुधारे,जयश्री रेखावार, आशा वाघमारे, शशिकला देशपांडे, लखत बी, लक्ष्मी कौरवार, तक्षशिला हिरे, नफिसा शेख, राम रतन नर्सिंग कॉलेजचे मंगेश जाधव सर, पुष्पा दुधारे, सुवर्णा टिळेकर,मेघा अंकुरवाड, किरण वाघमारे, मुस्कान शेख, शितल गोरेकर, रोहिणी उघडेराव, वैष्णवी जिल्हेवाड आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.