करियरनांदेड

श्री गुरु गोबिंद सिंघजी स्टडी चेअरसाठी आम्ही वचनबद्ध आहोत डॉ. विजय सतबीर सिंघ

नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत सुरु असलेल्या श्री गुरु गोबिंद सिंघ जी अभ्यासन केंद्राच्या स्टडी चेअरच्या इमारतीची तपासणी करण्यासाठी डॉ. विजय सतबीर सिंघ माजी आय. ए. एस. आणि प्रशासक गुरुद्वारा सचखंड बोर्ड हे स्वतः विद्यापीठ येथे भेट दिली.

विद्यापीठामध्ये वाइस चांसलर डॉ. मनोहर चासकर जी आणि अन्य पदाधिकार्यांसोबत एक विशेष बैठक पार पाडण्यात आली. डॉ. विजय सतबीर सिंघ यांनी श्री गुरु गोबिंद सिंघ जी अभ्यासन केंद्राच्या स्टडी चेअरच्या कामावर विशेष लक्ष देऊन प्रोत्साहन दिल्याबद्दल वाइस चांसलर डॉ. मनोहर चासकर जी यांचे धन्यवाद व्यक्त केले आणि या कामात कोणत्याही प्रकारची काहीही मदत किंवा गरज वाटल्यास गुरुद्वारा बोर्ड त्यासाठी खुल्या मनाने तयार आहे.

माननीय व्ही. सी. डॉ. मनोहर चासकर जी यांनी आपल्या कार्यालयामध्ये डॉ. विजय सतबीर सिंघ आणि स. जसवंत सिंघ बॉबी यांचा स्वागत आणि सत्कार केला. व्ही. सी. साहेबांनी सांगितले कि लवकरात लवकर हि इमारत बनून तयार होईल आणि श्री गुरु गोबिंद सिंघ जी यांचे जीवन कार्य, शिकवणी आणि गुरु ग्रंथ साहिब जी यांचा मराठी भाषेऐवजी प्रादेशिक भाषांमध्येही भाषांतर करण्यात येईल.

व्ही. सी. साहेबांनी आपल्या मदतीसाठी आणि कामाला पाठींबा देण्यासाठी डॉ. विजय सतबीर सिंघ यांचा धन्यवाद केला आणि सांगितले कि येणाऱ्या काळामध्ये आम्ही येथे आंतरराष्ट्रीय पातळीवर परिसंवाद ठेवण्याचा विचार करीत आहोत. जेणेकरून श्री गुरु गोबिंद सिंघ जी यांच्या प्रेरणादायी जीवन आणि विचारांचा लाभ मानवतेला प्राप्त होईल. यावेळी त्यांच्यासोबत अमरप्रीत सिंघ जी जज आणि आदरणीय वर्ग उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!