उस्माननगर। भारतीय जनता पार्टीचे यशस्वी पंतप्रधान श्री.नरेंद्र दामोदरदास मोदी यांची भारताचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान झाल्याबद्दल उस्माननगर येथील भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सदस्य तथा माजी सरपंच,मा.चेअरमण तुकाराम वारकड गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली चौका चौकात फटाक्यांच्या आतिशबाजी व घोषणा देऊन आनंदोत्सव भाजपाचे तालुका उपाध्यक्ष सुरेश मामा बास्टे यांच्या कृषी दुकानासमोर साजरा करण्यात आला.
यावेळी सदाशिव मठपती महाराज ,भाजपा तालुका सरचिटणीस तथा ग्रामपंचायत सदस्य संजय ( रूद्र ) वारकड , शासकीय गुत्तेदार देशमुख कौठेकर , बालाजी पु. पाटील घोरबांड , बाबूराव पाटील घोरबांड , मारोती पाटील घोरबांड ,बाळू बास्टे ,बालाप्रसाद होळगे , पिडगे , यांच्या सह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे बहुमत आल्याने पुन्हा एकदा ( हॅट्रिक) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून राष्ट्रपती यांच्या कडून शपथ घेतल्यानंतर उस्माननगर येथे भाजपाच्या वतीने बस स्टॉप वर व गावातील प्रमुख ठिकाणी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी झटणारे भक्कम विकासाभिमुख नेतृत्व असलेले आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी साहेब आहेत. तुकाराम वारकड गुरूजी