श्रीक्षेत्र कलंबर ( खु.) येथे १७ व १८ रोजी वारकरी परिषद ,किर्तन सोहळा व भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन
उस्माननगर, माणिक भिसे| मराठवाड्यातील महान संत योगीराज श्री संत निवृत्ती महाराज व ब्रम्हीभुत श्री संत मोतीराम महाराज संस्थान कलंबर खु.ता.लोहा येथे भक्तांच्या नवसाला पावणारे प्रसिद्ध असे देवस्थान म्हणून सुपरिचित आहे.
मराठवाड्यातील दोन्ही संतांचे एकत्रीत असणारे पहिले मंदिर वैष्णवधाम श्रीक्षेत्र कलंबर खु.ता.लोहा येथे मुर्ती स्थापन व कलशारोहण प्रथम वर्धापन दिनानिमित्त दिनांक १७ व १८ डिसेंबर २०२३ रोजी वारकरी परिषद, किर्तन सोहळा व भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मराठवाड्यातील संत,महंत, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दि.१७ डिसेंबर २०२३ रविवारी सकाळी ९ वा. वारकरी परिषदेचे उद्घाटन श्री.१०८ गुरू गयबी नागेंद्र भारती महाराज मठाधिपती पानभोसी व श्री. महंत जीवनदासजी उदासी महाराज संस्थान चुडावा ता.पूर्णा यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी वारकरी परिषद मध्ये समाजात वारकरी सांप्रदायाचा मुल्य विचार रुजविणे या विषयावर १ तास व्याख्यान आयोजित करण्यात आले.या व्याघ्यानास प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ.शिवाजी शिंदे ( माऊली ) डॉ.गोविंद नांदेडे ( मा.शिक्षण संचालक ) ह.भ.प. गंगाधर महाराज कुरुंदकर,प्रा. डॉ. दत्तात्रय बचाटे यांचे सकाळच्या सत्रात तर दुपारच्या वेळी ह.भ.प. मधुसूदन महाराज कापसीकर ,ह.भ.प. निळोबा महाराज हरबळकर ,ह.भ.प. मधुकर महाजन बारूळकर ,प्रा.डाॅ. हनुमंत भोपाळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. श्री.संत निवृत्ती महाराज व श्री संत मोतीराम महाराज ग्रंथांचे सामुहिक ग्रंथ पारायण व दुपारी १ ( एक) वाजता किर्तनकार म्हणून ह.भ.प. निवृत्ती महाराज इसादकर यांचे होणार तर दु .३ ते ४ दरम्यान महाआरती आयोजित केली.त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी परिसरातील भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ह .भ.प. संभाजी महाराज मोरे,शंकर जांगमे श्री. सुरेश घोरबांड सर ,श्री.नामदेव पा. श्री. गोविंदराव पा.नारायण गिरी , रामदास पा. , विठ्ठल लाठकर , विठ्ठल कोटेवाड, अंकुश मोरे सह कलंबर परिसरातील भक्तमंडळी यांनी केले आहे.