हिंगोली| हिंगोली जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीसह पार्टीच्या पावसाने शेतकऱ्यांना अक्षरशा हैराण करून सोडले आहे. त्यामुळे शासनाने हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमी मध्ये दिवाळी साजरी केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात यावर्षी पीक परिस्थिती गंभीर आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीन सारखे महत्त्वाचे पीक हातचे गेले. त्यातच सोयाबीन पिकावर येलो मोझॅक चा प्रादुर्भाव झाल्यामुळे पीक उत्पादनावर परिणाम झाला आहे. सोयाबीनच्या लागवडीचा खर्चही निघाला नाही. इतर पिकांची ही अशीच अवस्था आहे. हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ असताना विमा कंपनीकडून मात्र पिक विमा आगीम देण्याचे टाळण्यात आले. तसेच शासनाने ही हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली. त्यातच कहर म्हणजे शासनाने हिंगोली जिल्ह्यातील 30 पैकी केवळ 17 मंडळातच दुष्काळ जाहीर केला असून इतर मंडळांना मात्र यातून वगळण्यात आले आहे या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
दरम्यान शासनाने दिवाळीपूर्वी देण्याची पिक विमा आगीम देण्याची घोषणा केली. मात्र एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा अग्रीम मिळालाच नाही. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी आज चक्क स्मशानभूमीत दिवाळी साजरी करून शासनाच्या निषेध केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, नामदेव पतंगे, सखाराम भाकरे, संतोष माहूरकर, संतोष वैद्य, दशरथ मुळे, नारायण देव, विश्वनाथ घोडके आदी उपस्थित होते.
सध्या राज्यात कोरडा दुष्काळ असल्याने हिंगोली जिल्ह्यांमधील सर्व तालुके समाविष्ट करण्यात यावी व तत्काळ पिक विमा अतिवृष्टीचा अनुदान दिवाळीपूर्वी मिळणे अपेक्षित होतं मात्र सरकारने दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गोरेगाव या ठिकाणी स्मशान भूमीमध्ये आपली दिवाळी साजरी केली व सरकारचा घोषणा देऊन निषेध करण्यात आला यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये गजानन कावरखे, नामदेव पतंगे, सखाराम भाकरे, संतोष माहूरकर, संतोष वैद्य, दशरथ मुळे, नारायण देव, विश्वनाथ घोडके आदी उपस्थित होते.