लोहा। पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने लोहा शहराच्या पोलीस ठाणे निर्मितीच्या आज पर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच शहर व ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांना परिसर गजबजून गेला होता. ज्यांनी कधीच ठाण्याच्या गेट मध्ये पाऊल ठेवला नाही असा चिमुकल्यासाठी एक वेगळं अनुभव होता.पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर व टीमने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व ,चित्रकला, निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.
वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी पोलीस दलात कार्यतत्पर ओमकांत चिंचोलकर यांच्या पुढाकाराने पोलीस स्थापना दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन आयोजन करण्यात आले होते शहर व लगतच्या पंधरा शाळांनी यात सहभागीनोंदविला.यावेळी सहायक पोलिस निरीक्षक साईप्रसाद चन्ना,पोलीस उपनिरीक्षक सोनकांबळे, श्री नाईक, श्रीमती काळे, शिक्षण विस्तार अधिकसरी श्रीमती आर बी गोरशेटवार-रुद्रावार, मुख्याध्यापक दामोदर वडजे, उपमुख्याध्यापक बी डी जाधव, बी एन गवाले, अंनत चव्हाण, श्रींमती के एल गायंके, श्रीमती बच्चेवार , बी एल आडे, संतोष कुलकर्णी, केंद्रे , जमादार केंद्रे, डीएसबीचे जामकर यासह शिक्षक -पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी वाहतूक नियम व कायद्याची ओळख या बाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच पोलीस ठाणे कसे चालते, तेथील शस्त्र व इतर मुद्देमाल याची माहिती दिली.प्रस्ताविक हलसे यांनी केले .बँड च्या धूनवर विद्यार्थ्यांचे पाय थिरकले.चांगले नियोजन पोलिसांनी केले होते वक्तृत्व स्पर्धेसाठी शिक्षक गजानन होळगे, नागोराव जाधव, काशिनाथ शिरसिकर, जोशी, निबंध स्पर्धे साठी आर बी गोरशेटवार, रमेश पवार, जगापल्ले, नदीम सय्यद, सौ बोरकर यांनी चित्रकला साठी परीक्षक म्हणून काम पाहिले. संचलन श्रीमती रुद्रावार मॅडम यांनी केले आभार बी डी जाधव यांनी केले.