हिमायतनगर शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात विघ्णहर्ता गणेश मूर्तीची शुक्रवारी होणार स्थापना
हिमायतनगर, परमेश्वर काळे| शहरातील पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या बाजार चौकातिल दक्षणिमुखी श्री हनुमान मंदिरात शुक्रवारी विघ्णहर्ता गणपती बाप्पाच्या मूर्ती व महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या सांख्येने उपस्थित होऊन शोभा वाढवावी असे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीने अध्यक्ष बाळू अण्णा चवरे व सर्व सदस्यांनी यांनी केले आहे.
हिमायतनगर शहरातील गाजवलेल्या परिसरात म्हणजेच पोलीस ठाण्याच्या दक्षिण बाजून दक्षिण मुखी हनुमान मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार शहरातील प्रतिष्ठित व्यापारी शांतीलाल श्रीश्रीमाळ व मंदिर कमिटीच्या सदस्यांसह येथील भाविकांच्या सहकार्यातून नुकताच करण्यात आला आहे. त्यामुळे हनुमान मंदिराचा कायापालट झाला असून, बाजार चौक येथील श्री हनुमान मंदिरॅट दररोज दर्शन घेऊन व्यापारी, नागरिक व शेतकरी आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात करतात. वर्षभर येथील मंदिरात सण उत्सवानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम विधिवत पूजा अर्चना होऊन महाप्रसादाच्या पंगती देखील केल्या जातात. तसेच नित्यनेमाने पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या हस्ते मंदिरात असलेल्या हनुमान, दत्तात्रेय, गणपती, शनिदेव यासह सर्व देवतांची पूजा अर्चना केली जाते.
मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर येथे गणपती बाप्पाची संगमरवरी दगडात बनविलेली मूर्ती आणण्यात आली असून, महादेव पिंडीची देखील मूर्ती आणण्यात आली आहे. या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना शुक्रवार दि.१५ रोजी करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने गणेश मूर्ती स्थापना तयारी पूर्ण झाली असून, सकाळी अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 9 ते 11 या शुभमुहूर्तावर गणपती बाप्पाच्या मुर्ती स्थापना पुजा आरती करण्यात येणार आहे. दुपारी 12 नंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात येणार आहे. गणेश मूर्ती स्थापना व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदिर कमिटीच्या वतीने अध्यक्ष बाळू अण्णा चवरे, उपाध्यक्ष संतोष पळशीकर, सेक्रेटरी शिवअप्पा तुपतेवार, डॉ आनंद माने, श्याम कात्रे, अमोल बंडेवार, शंकर पाटील, राजू ठाकूर, सतीश बास्टेवाड, निलेश अप्पा, अतुल तुपतेवार, बाळू सातव, धर्मपुरी गुंडेवार, आदींसह मंदिर कमिटी व गावकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.