नांदेड। दिनांक 20/05/2024 रोजी 17.00 वाजता यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग व लैगीक अत्याचार करून अश्लिल शिवीगाळ केल्याची तक्रारी वरून पोलीस स्टेशन लिंबगाव गुरन 63/2024 कलम 354, 294 भादवी सहकलम 7,8 लैंगीक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक के. बि. केजगिर पो.स्टे. लिंबगाव हे करत आहेत, सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे कामी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब पोलीस अधिक्षक नांदेड यांनी आरोपीस तात्काळ अटक करून कार्यावाही करण्याचे आदेशित केले होते.
त्यावरून श्री एम. एन. दळवे पोलीस स्टेशन प्रभारी यांनी पथक मध्ये पोलीस उप निरीक्षक के. बी. केजगिर सोबत सपोउपनि / एस. बी. सुर्यवंशी, पोहेकॉ/199 काजी, पो.कॉ./ 2748 पेदेवाड यांचे पथक तयार करण्यात आले. सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी गोपणिय व खात्रीशिर बातमीदार यांचे माहितीच्या आधारे सदर आरोपी हा मौजे नाळेश्वर गावाचे बाजुचे एका शेतात अंधारात बसला आहे.
अश्या माहिती प्राप्त झालेवरून सदर ठिकाणी जावुन शोध घेतला असता आरोपी हा पोलीसांना पाहुण अंधाराचा फायदा घेवुन पळुन जात असतांना त्याचा पाठलाग करून पकडले व त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शंकर गौतम गच्चे वय 25 वर्षे व्यवसाय मजुरी रा. नाळेश्वर ता. जि. नांदेड असल्याचे सांगीतले सदर आरोपीस अवघ्या दोन तासात अटक करून त्यास मा. न्यायालयात हाजर केले असता मा. न्यायलयाने न्यायालयीन कोठडी मंजुर केली आहे.
सदरची कामगिरी मा. श्रीकृष्ण कोकाटे साहेब पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री खंडेराय धरणे साहेब अपर पोलीस अधिक्षक भोकर, मा. श्री अबिनाश कुमार साहेब अपर पोलीस अधिक्षक नांदेड, श्री डॅनियल बेन साहेब पोलीस उप अधिक्षक नांदेड ग्रामीण, श्री दळवे साहेब पोलीस स्टेशन लिंबगाव प्रभारी यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी के. बी. केजगिर पोलीस उप निरीक्षक व एस. बी. सुर्यवंशी सपोउपनि, पोहेकॉ/ 199 काजी, पो.कॉ. 2748 पेदेवाड यांनी पार पाडली आहे.