नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी लोहा तालुक्यातील जानापुरी ग्रामपंचायतीस भेट देऊन विविध कामांची पाहणी केली.
बुधवार दिनांक 6 डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल ह्या लोहा तालुक्यात दौ-यावर असतांना त्यांनी अचानक जानापूरी ग्रामपचंचायतीस भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेला भेट देवून विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. गावस्तरावरील स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवथापन, जल जीवन मिशन आदी कामांची पाहणी केली. याप्रंसगी सरपंच दादाराव गच्चे, उप सरपंच संतोष कदम, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक आदींची उपस्थिती होती.