मराठवाड्यातील प्रलंबित सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सकारात्मक केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

नांदेड| यवतमाळ वर्धा नगर बीड परळी या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देणे राज्य शासनाकडून हमीपत्र आल्याबरोबर नांदेड बिदर रेल्वे मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करणे तसेच नांदेड लोहा, लातूर बोधन मुखेड उदगीर या रेल्वे मार्गाच्या कामांना मंजुरी देणे यासारख्या मराठवाड्यातील सर्व रेल्वे प्रश्नसंबंधी आमचे सरकार सकारात्मक आहेत हे सर्व प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिल अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने नवी दिल्ली संसद भवन येथे रेल्वेमंत्री यांची आज भेट घेतली त्याप्रसंगी वैष्णव यांनी वरील ग्वाही दिली.
या शिष्टमंडळात नांदेड जिल्हा रेल्वे परिषदेचे शंतनू डोईफोडे, भारतीय जनता पार्टीचे प्रवीण साले,चैतन्य बापू देशमुख,शेतकरी संघटनेचे गुणवंत पाटील हंगरगेकर,राजा खंडेराव देशमुख,मिलिंद देशमुख, बालाजी बच्चेवार,अजय सिंह बिसेन यांचा समावेश होता. मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांची आपल्याला जाणीव असून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्याकडे ज्या रेल्वे संबंधी मागण्या केल्या असतील त्यातील बहुशांश मागणी मी पूर्ण केल्या असून राहिलेले कामे लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
देशभरात रेल्वेचा विस्तार होत असताना मराठवाड्यासारख्या मागास भाग यापासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत असे अश्विनी वैष्णव म्हणाले. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी रेल्वे मागण्यांची विस्तृत निवेदन रेल्वेमंत्र्यांना दिले. तर माजी खासदार व्यंकटेश काब्दे यांनी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने रेल्वे संबंधी विविध मागण्या सादर केल्या. यानंतर शिष्ट मंडळ रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन रेल्वे संबंधी विविध मागण्या मांडल्या सध्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाची काम जोमाने सुरू असून, मार्च 2024 पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण होत आहे हे काम पूर्ण होताच नांदेड मुंबई अशी वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा दानवे यांनी केली. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुदत वाढ देण्याच्या प्रश्नावर मी पाठपुरावा करत असल्याची ग्वाही अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.
