नांदेडलाईफस्टाईल

पत्रकार लक्ष्मण कांबळे व जि.प. शिक्षक अनिल कांबळे यांना मातृशोक

उस्माननगर,माणिक भिसे। पोखरभोसी ता ‌लोहा येथील रहिवासी तथा पत्रकार तथा उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे सह कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांच्या मातोश्री कालवश शेवंताबाई रोहीदास कांबळे पोखर भोसीकर यांचे दि.२६/०५/२०२४ रोज रविवारी रात्री ११.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले .त्या ७५ वर्षीच्या होत्या .

त्या कलंबर सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी रोहीदास कांबळे यांच्या पत्नी असून जि.प. नांदेड विभागातील तंत्रस्नेही शिक्षक अनिल कांबळे, दैनिक चालु वार्ता व श्रमिक एकजूट उस्माननगर प्रतिनिधी पत्रकार लक्ष्मण कांबळे, इंजिनिअर भिमराव कांबळे तसेच रमा राजू व्यवहारे यांच्या मातोश्री आहेत.

त्यांचा अंत्यविधी मौजे पोखरभोसी ता.लोहा जि.नांदेड येथे दि.२७/०५/२०२४ रोज सोमवारी दुपारी येथील स्मशानभूमीत पार पडला . यावेळी प्रा . मनोहर धोंडे , यांच्यासह राजकीय क्षेत्रातील , सामाजिक कार्यकर्ते , शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. कालवश शेवंताबाई यांच्या पश्चात पती,तीन मुले, तिनं सूना,एक मुलगी,जावाई,नातू,नाती , पणतू असा परिवार आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!