किनवट, आशिष देशपांडे| काॅंग्रेसचे झारखंड राज्यातील खासदार धीरज साहु यांच्याकडे आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल ३५० कोटींपेक्षा जास्त बेहिशोबी काळापैसा मिळाला. या नेत्याच्या तसेच काॅंग्रेस पक्षाच्या विरोधात सोमवारी दि.११ भाजपा महिला मोर्चाच्या ( नांदेड उत्तर ) जिल्हाध्यक्षा संध्या राठोड यांच्या नेतृत्वात किनवट शहरातील जिजामाता चौकात साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध करण्यात आला.
यावेळी भाजपा नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर,भाजपा नेते प्रफुल्ल राठोड, किनवट तालुकाध्यक्ष बालाजी आलेवार,महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा उषा धात्रक, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख आशिष देशपांडे, शहराध्यक्षा गंगुबाई परेकर,शहराध्यक्ष संतोष चनमनवार,संदीप केंद्रे, सुकेशिनी कपाटे, स्वागत आयनेनीवार, युवा मोर्चाच तालुकाध्यक्ष आशुतोष बेद्रे, पवन गिरी,भावना दीक्षीत, विद्या पाटील, सुरेश साकपेल्लीवार,आनंद मच्छेवार,जय वर्मा, सुभाष कालावार,हौसाजी काकडे,सतीश नेम्मानीवार,मनोहर ताटे,गौरव ईटकेपेल्लीवार, निकेतन सुरोशे, पृथ्वीराज ठाकरे, सुरेश सकपेल्लीवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्षा सौ.संध्या राठोड म्हणाल्या की,राज्यसभेचा तीनवेळा खासदार राहिलेल्या धीरज साहु याच्याकडे ३ दिवसांपासून सुरू असलेल्या छाप्यात कुबेराच्या खजिन्यालाही लाजवेल,इतकी बेहिशेबी मालमत्ता निघत आहे.ट्रकने नोटांची वाहतूक करूनही त्या संपत नाहीत. काँग्रेस सरकारने त्यांच्या ७० वर्षाच्या राजवटीत भ्रष्ट मार्गाने काळी संपत्ती जमवली. नुकत्याच झालेल्या तीन राज्यांच्या निवडणुकीत मतदारांनी नरेंद्र मोदी यांनाच कौल दिला आहे.
ना खाऊंगा,ना खाने दुंगा या न्यायाचाच हा कौल असून,आगामी लोकसभा निवडणुकीतही पुन्हा मोदी पर्वाचाच विजय होणार,हा विश्वास नव्हे,तर आम्हाला खात्री आहे,असे प्रतिपादनही संध्या राठोड यांनी यावेळी केले.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनीही काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा समाचार घेतला. भाजपाकडून धीरज साहु यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन त्यांच्या पुतळ्याचे दहन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.