खडकी बा फिडरमध्ये पावसाळ्यातही वीज पुरवठा वारंवार होतो गुल नागरिकांचा जीव धोक्यात – सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा आंदोलन वसंत राठोड यांचा इशारा

हिमायतनगर। तालुक्यातील मोजे खडकी बाजार परिसरात गेल्या काही महिन्यापासून महावितरणच्या लाईनमन व अभियंता यांच्या मनमानी कारभारामुळे या भागातील नागरिकांना रात्रीच्या वेळी खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, या भागातील नागरिकांचे घरी शेत परिसराला लागू असल्याने सरपटणारे प्राणी बाहेर येऊन जीव धोक्यात येऊ लागला आहे. तात्काळ वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा बाबतीचा खेळ थांबवा अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते वसंत राठोड यांनी दिला आहे.
आज बुधवारी सायंकाळी चार वाजल्यापासून लाईट नसल्याने संध्याकाळी अंधाराच्या वेळी सापाने एका बालकाच्या हाताला गुंडाळला घेतला होता. दैव बलवतर म्हणून घरच्यांची नजर गेली त्यामुळे या बालकाला काही झाले नाही. मात्र लाईट नसल्यामुळे असे अनेक प्रकार घडत आहेत.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर या भागातील लाईनमन अथवा कनिष्ठ अभियंताला संपर्क केला तर ते फोन उचलत नाहीत त्यामुळे नागरिकांना वीज पुरवठ्याबाबतची मोठी समस्या येऊ लागली आहे एवढेच नाही तर भर उन्हाळ्यात देखील शेतकऱ्यांना खंडित वीज पुरवठ्यामुळे आपल्या शेती पिकांच्या नुकसान करावे लागले या सर्व प्रकाराला महावितरणचे अधिकारी कर्मचारी जबाबदार असून यांनी आपल्या कारभारात तात्काळ सुधारणा करावी अन्यथा गाठ माझ्याशी आहे असेही वसंत राठोड म्हणाले.
या प्रकारामुळे खडकी बाजार गावातील नागरिकांनी महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. या खडकी बाजार फिडरचा कारभार पाहणाऱ्या अभियंता मनमानी कारभाराला उपकार्यकारी अभियंत्यांनी लगाम लावावा. आणि या भागातील होत असलेल्या खंडित वीज पुरवठा थांबून गावकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा द्यावा. अन्यथा महावितरणच्या विरोधात कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत राठोड यांच्यासह संतप्त झालेल्या पालकांनी दिला आहे.
