
हदगाव, शे.चांदपाशा| सोयाबीन या पीकाला अत्यंत कमी उतारा येत असुन, हदगाव तालुक्यात लिलाव पद्धत नसल्याने मार्केट मध्ये सोयाबीनला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे पेरणीसाठी लागलेला खर्च ही निघत नाही प्रति बँगला सोयबीन काढण्यास तीन ते चार हजार खर्च येत आहे. आता तालुक्यात मराठा आरक्षणामुळे जबाबदार आमदार खासदार यांना गावबंदी केल्याने आमच्या ‘व्यथा ‘कुठे माडव्यात व दिवाळी व शेतीला लागलेला खर्च कसा काढवा असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे..!
जुलै-आँगष्ट महीण्यात झालेल्या धो-धो पाऊस झाला त्यामुळे शेतकरी हैराण झाले होते. त्यानंतर ‘सोयाबीनवर ‘येलो मोझँक ‘ या रोगाच्या प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे. उत्पादन उतारा दोन ते पाच क्विंटल येत असून, कापणी व मळणीच्या वेळी पावसाने दडी मारली होती. त्यामुळे ‘सोयाबीन ‘ रेनटच पासुन वाचली. मार्केट मध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमी भाव 4600 रु आहे.
व्यापारी मुहूर्तावर त्यापेक्षा कमी भावाने माल खरेदी करतो आहे. विशेष म्हणजे आता लोकप्रतिनिधीना गावबंदी मुळे तर अश्या व्यापारा-याची चांदी होत आहे. शेतमाल हमी भाव कायदा काय..?आहे हे सगळे विसरुन गेल्याचे चिञ दिसुन येत आहे. सर्वसामान्य शेतकरी हा सर्वाकडून लुटल्या जात आहे. शेतकरी दिवाळी व इतर आर्थिक समस्या कश्या प्रकारे सोडविणार हा कायम प्रश्न उपस्थित होत आहे.
